Homeपब्लिक फिगरआटपाडी नगरपंचायत होणार...

आटपाडी नगरपंचायत होणार नगर परिषद!

नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतऐवजी नगर परिषद करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवण्याची सूचनाही त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांमधील  विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नगरविकास मंत्री सांगली दौऱ्यावर होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर, सुमन पाटील यावेळी उपस्थित होते.

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे होणारे बदल लोकप्रतिनिधी व प्रशासनाला लक्षात आणून देण्यासाठी विशेष सादरीकरण यावेळी करण्यात आले. बदललेल्या विकास नियंत्रण नियमावलीचे फायदे लोकांना मिळणार असून हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागवार कार्यशाळा घेण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.

जयंत पाटील यांनी आष्टा आणि ईस्लामपूर याबाबत पत्र लिहून केलेल्या सूचना नक्की पूर्ण करू असही त्यांनी स्पष्ट केले. विटा, तासगाव येतील पाणी पुरवठा पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांनी केल्या. त्यासोबतच पलुस पाणीपुरवठा योजनेतील भूसंपादनाच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

नाट्यगृहाचा प्रश्न लवकरच सोडवणार

आटपाडीमधील ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येणारे प्रस्तावित नाट्यगृह आणि स्मारक जमीन अधिग्रहणामुळे रखडले आहे, याकडे आमदार अनिल बाबर यांनी लक्ष वेधले. त्यावर याबाबत नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू, असे शिंदे म्हणाले. आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे गीतरामायणकार गदिमा हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content