Homeएनसर्कल1 ऑक्टोबरपासून रेल्वे...

1 ऑक्टोबरपासून रेल्वे बुकिंगसाठी पहिल्या 15 मिनिटांत आधार अनिवार्य

आरक्षण प्रणालीचा लाभ सर्वप्रथम सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावा आणि गैरवापर करणाऱ्या घटकांकडून होणारा वापर टाळ्याकरीता येत्या 1 ऑक्टोबर 2025पासून, रेल्वेच्या सामान्य आरक्षणाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 मिनिटांत, आरक्षित सामान्य तिकीट फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच केले जाऊ शकेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या संकेतस्थळ/अ‍ॅपद्वारे हे तिकीट बुक केले जाऊ शकेल.

रेल्वे

तथापि, सध्या भारतीय रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काऊंटरद्वारे सामान्य आरक्षित तिकीट बुक करण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. तसेच, अधिकृत रेल्वे तिकीट एजंट्सना सुरुवातीच्या दिवशी आरक्षित तिकीट बुक करण्याची परवानगी नसलेल्या 10 मिनिटांच्या प्रतिबंधातही कोणता बदल होणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content