Homeन्यूज अँड व्ह्यूजग्रामीण भागात डिजिटल...

ग्रामीण भागात डिजिटल कनेक्टीव्हिटी वाढणार?

डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी, दूरसंचार विभागाने एक योजना सुरू केली असून त्याद्वारे, ग्रामीण भागात फायबर टु द होम (एफटीटीएच) ब्रॉड बॅन्ड सेवेचा विस्तार करण्यासाठी इंटरनेट सेवा प्रदात्यांना (आयएसपी) मान्यता दिली जाणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये :

या योजनेअंतर्गत, दूरसंचार विभागाने नऊ इंटरनेट सेवा प्रदाते निश्चित केले असून, अ, ब आणि क अशा तीन श्रेणीत प्रत्येकी तीन प्रदाते असतील. ज्यांनी, ग्रामीण भागात, एका वर्षात जास्तीत जास्त फायबर टु द होम जोडण्या दिल्या आहेत, अशा प्रदात्यांमधून या नऊ जणांची निवड करण्यात आली आहे.

या मान्यताप्राप्त प्रदात्यांना, प्रमाणपत्र आणि आयएसपी चे नाव दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. एका वर्षासाठी म्हणजेच एप्रिल ते मार्च या काळासाठी ही मान्यता असेल. पहिली मान्यता एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या काळासाठी असेल.

प्रत्येक श्रेणीसाठी किमान नेट जोडणीचे निकष खालीलप्रमाणे असतील:  

श्रेणी अ: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 50,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित आहे.

श्रेणी ब: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 10,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित आहे.

श्रेणी क: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 2,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित असेल.

यातून ग्रामीण भागाचा सामाजिक आर्थिक विकास आणि देशाच्या सर्वसमावेशक वृद्धीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी, कृपया दूरसंचार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://dot.gov.in/data-services/2574 ला भेट द्या.

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content