HomeArchiveताणतणावास कारण की..!

ताणतणावास कारण की..!

Details
ताणतणावास कारण की..!

    16-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
विनोद साळवी..
 
 
‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्घीचे कारण.. चित्ती असू द्यावे समाधान..’ अशी अनेक उपदेशपर सुवचनंही गर्दी, गोंगाट आणि अंतर्मनाच्या तळात सातत्याने सुरू असलेल्या ढवळाढवळीमुळे फिकी पडू लागली आहेत. अगदी ताणतणाव व्यवस्थापनाचे धडे देणारे वर्ग, बाबा-बुवांच्या अंगार्याे-धुपार्यांवसाठी कराव्या लागणार्याु वार्याा, जत्रा-उत्सवात मन रमवणे, सहली-सफरी घडवणे तरीही आपला मानसिक गुंता काही केल्या सुटत नाही. चिंता, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या आदी कारणांमुळे आपल्यातील माणूस जीवनयात्रा संपवण्याचं अंतिम टोक गाठण्यापर्यंतही पोहोचतो. आपल्या भारतात तर दर एक लाख व्यक्तींच्या मृत्यूपैकी २३ मृत्यू केवळ आत्महत्त्येमुळे होतात. यावरून आपलं मन आणि शरीर किती सशक्त आहे, याचा पदोपदी अंदाज येतो.
 
 
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसारख्या शहर व महानगरांतील लोकांच्या ताणतणावाची व्याख्या तर त्याहूनही वेगळी आहे. इथे घड्याळाच्या काट्यावर धावणार्याह माणसाचं मन अगदी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेप्रमाणे झालं आहे. मन वढायं वढायं.. उभ्या पिकातलं ढोर.. किती हाकला हाकला.. फिरी येतं पिकांवर! मन मोकाट मोकाट.. त्याले ठायी ठायी वाटा.. जशा वार्या नं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा! मन जहरी जहरी.. याचं न्यारं ते तंतर, अरे विंचू, साप बरा.. त्याले उतारे मंतर! माणसाने माणसांसाठी वाढवून ठेवलेल्या अडचणींचा डोंगर, वारेमाप अपेक्षांचं ओझं आणि वेळेचं गणित आपल्यातील माणसाला जराही स्वस्थ बसू देत नाही. गाव असो वा शहर, ताणतणाव हा माणसाच्या जगण्याचं अविभाज्य अंग आपणंच बनवून घेतलं आहे. आता हेच बघा ना. दररोजच्या वाहतूककोंडीमुळेही आपल्या ताणतणावात भर पडत आहे. हा वाहतूकताप मधुमेह, थकवा व हृदयरोगासाख्या आजारांना निमंत्रण देतो आहे.
 
 
भारतातील महत्त्वाच्या १० शहरांत ‘एज ऑफ रेज’ नामक संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. मुंगीच्या पावलांनी चालणारी शहरांतील वाहतूक आणि रस्तोरस्ती, महामार्गांवर दररोज वाजणारा वाहतुकीचा बोर्याा हे आपण पाहतोच. या कोंडीतून मार्ग काढताना रूग्ण्वाहिकेतून रूग्णालयाकडे निघालेला रूग्ण दगावण्याचे प्रकारही वाढत आहेत. अगदी नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात आपल्या गावाकडे जाणार्याा गणेशभक्तांचा उत्साह नेहमीप्रमाणे कमालीचा होता. परंतु, खराब रस्ते, वाहतूककोंडी आदी कारणांमुळे त्यांच्या मनात संतापवाढीसाठी कारण मिळालं. नजर फिरवावी तिथंवर लागणार्याव वाहनांच्या लांबवालक रांगा हे शहरे, महानगरांतील प्रवासही अधिक तापदायी वेदनादायी बनवत आहे. दररोज घरातून बाहेर पडल्यास आपला किमान २० ते २५ मिनिटांचा तर काहींसाठी त्याहूनही अधिकचा प्रवास हा वाहतूककोंडीत गेल्यावाचून राहत नाही. वाहनचालक किंबहुना बस, रिक्षाने प्रवास करणार्यात प्रवाशांना याचा मनस्ताप हे दररोजचं झालं आहे. महानगरांतील जवळपास ५६ टक्के लोकांना अशा विकाराचा सामना करावा लागतो आहे. इथं राग आणि ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासही वाव नाही.
 

 
 
 
एकेमकांना खेटून नव्हे तर या वाहनांवर पाय ठेवून पुढचा प्रवास करावा, इथवर हा संताप अनावर व्हावा. मंदगतीने चालणार्याे गाड्या, अतिघाई, वाहतूक नियमांना फाटा आदी अनेक कारणे नव्या ताणतणावात भर घालत आहेत. देशातील ८९ टक्के लोकांनी अशा ताणतणावांचा त्रास होत असल्याचंही कबूल केलं आहे. वाहतूककोंडीत तासन्तास अडकून पडल्याने कितीतरी लोक राडेबाजीवर उतरतात. या ‘रोड रेजचा’च भाग देशातील ८९ टक्के लोक आहेत. ताणतणावाचा हा अंश मानवी आरोग्याला कधी नि कोणत्या मार्गाने बाधा पोहोचवेल, याचा काहीच नेम उरलेला नाही. शहरातील माणूस हा आधीच नाना व्याधी आणि दररोजच्या जगण्यातील संघर्षाने ग्रासला असताना वाहतूककोंडीही आजार होऊ शकतो, याची वर्दी कधीचं आपल्याला मिळाली आहे. हे ताणतणाव आपल्यावर कुणी लादले की आपण ओढवून घेतले, मानवी गरजांची यादी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. या गरजपूर्तीसाठी आपण प्रत्येक जण झटत असतो. परंतु, धावपळीत आपण आपल्या जगण्याचा अर्थचं गमावून बसतो. किंबहुना आपला आपल्याशी संवादही तुटून जातो.
 
 
आजघडीला वाहतूककोंडी, कौटुंबिक गरजा, महागाई, नोकरी-व्यवसायातील चढउतार, कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरण, परीक्षेतील यश-अपयश, पद-प्रतिष्ठा टिकवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, संततीसुख आदी छोटी-मोठी अनेक कारणे आपल्या ताणतणावाला भर घालत असल्याच्या निष्कर्षापर्यंत आपणच पोहोचलो आहोत. अगदी गरीब-श्रीमंत हा भेदाभेद न पाळता यातील काही गोष्टींची जीवनात बेरीज-वजाबाकी असली तरीही आपण हतबल, निराश होतो. आपल्याला पुढचं सर्व जगच अंधूक, धूसर दिसत जातं. जीवन जगणे ही एक कला आहे, अशी चांगलीचुंगली वाक्य आपल्या मनाला भावतात, स्पर्शून जातात. पण, वास्तवात जगताना पुन्हा आपल्या मनाचा समतोल राखणं आपणचं अधिक गुंतागुंतीच करून घेतो ते अगदी मनात क्षणाक्षणाला निर्माण होत असलेल्या प्रश्नांच्या कोंडीसारखं..”

 

 
 
विनोद साळवी..
 
 
“‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्घीचे कारण.. चित्ती असू द्यावे समाधान..’ अशी अनेक उपदेशपर सुवचनंही गर्दी, गोंगाट आणि अंतर्मनाच्या तळात सातत्याने सुरू असलेल्या ढवळाढवळीमुळे फिकी पडू लागली आहेत. अगदी ताणतणाव व्यवस्थापनाचे धडे देणारे वर्ग, बाबा-बुवांच्या अंगार्याे-धुपार्यांवसाठी कराव्या लागणार्याु वार्याा, जत्रा-उत्सवात मन रमवणे, सहली-सफरी घडवणे तरीही आपला मानसिक गुंता काही केल्या सुटत नाही. चिंता, नैराश्य, मानसिक आजार, उद्याची विवंचना, कौटुंबिक समस्या आदी कारणांमुळे आपल्यातील माणूस जीवनयात्रा संपवण्याचं अंतिम टोक गाठण्यापर्यंतही पोहोचतो. आपल्या भारतात तर दर एक लाख व्यक्तींच्या मृत्यूपैकी २३ मृत्यू केवळ आत्महत्त्येमुळे होतात. यावरून आपलं मन आणि शरीर किती सशक्त आहे, याचा पदोपदी अंदाज येतो.”
 
 
“मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसारख्या शहर व महानगरांतील लोकांच्या ताणतणावाची व्याख्या तर त्याहूनही वेगळी आहे. इथे घड्याळाच्या काट्यावर धावणार्याह माणसाचं मन अगदी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेप्रमाणे झालं आहे. मन वढायं वढायं.. उभ्या पिकातलं ढोर.. किती हाकला हाकला.. फिरी येतं पिकांवर! मन मोकाट मोकाट.. त्याले ठायी ठायी वाटा.. जशा वार्या नं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा! मन जहरी जहरी.. याचं न्यारं ते तंतर, अरे विंचू, साप बरा.. त्याले उतारे मंतर! माणसाने माणसांसाठी वाढवून ठेवलेल्या अडचणींचा डोंगर, वारेमाप अपेक्षांचं ओझं आणि वेळेचं गणित आपल्यातील माणसाला जराही स्वस्थ बसू देत नाही. गाव असो वा शहर, ताणतणाव हा माणसाच्या जगण्याचं अविभाज्य अंग आपणंच बनवून घेतलं आहे. आता हेच बघा ना. दररोजच्या वाहतूककोंडीमुळेही आपल्या ताणतणावात भर पडत आहे. हा वाहतूकताप मधुमेह, थकवा व हृदयरोगासाख्या आजारांना निमंत्रण देतो आहे.”
 
 
“भारतातील महत्त्वाच्या १० शहरांत ‘एज ऑफ रेज’ नामक संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. मुंगीच्या पावलांनी चालणारी शहरांतील वाहतूक आणि रस्तोरस्ती, महामार्गांवर दररोज वाजणारा वाहतुकीचा बोर्याा हे आपण पाहतोच. या कोंडीतून मार्ग काढताना रूग्ण्वाहिकेतून रूग्णालयाकडे निघालेला रूग्ण दगावण्याचे प्रकारही वाढत आहेत. अगदी नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात आपल्या गावाकडे जाणार्याा गणेशभक्तांचा उत्साह नेहमीप्रमाणे कमालीचा होता. परंतु, खराब रस्ते, वाहतूककोंडी आदी कारणांमुळे त्यांच्या मनात संतापवाढीसाठी कारण मिळालं. नजर फिरवावी तिथंवर लागणार्याव वाहनांच्या लांबवालक रांगा हे शहरे, महानगरांतील प्रवासही अधिक तापदायी वेदनादायी बनवत आहे. दररोज घरातून बाहेर पडल्यास आपला किमान २० ते २५ मिनिटांचा तर काहींसाठी त्याहूनही अधिकचा प्रवास हा वाहतूककोंडीत गेल्यावाचून राहत नाही. वाहनचालक किंबहुना बस, रिक्षाने प्रवास करणार्यात प्रवाशांना याचा मनस्ताप हे दररोजचं झालं आहे. महानगरांतील जवळपास ५६ टक्के लोकांना अशा विकाराचा सामना करावा लागतो आहे. इथं राग आणि ताणतणावाचं व्यवस्थापन करण्यासही वाव नाही.”
 

 
 
 
“एकेमकांना खेटून नव्हे तर या वाहनांवर पाय ठेवून पुढचा प्रवास करावा, इथवर हा संताप अनावर व्हावा. मंदगतीने चालणार्याे गाड्या, अतिघाई, वाहतूक नियमांना फाटा आदी अनेक कारणे नव्या ताणतणावात भर घालत आहेत. देशातील ८९ टक्के लोकांनी अशा ताणतणावांचा त्रास होत असल्याचंही कबूल केलं आहे. वाहतूककोंडीत तासन्तास अडकून पडल्याने कितीतरी लोक राडेबाजीवर उतरतात. या ‘रोड रेजचा’च भाग देशातील ८९ टक्के लोक आहेत. ताणतणावाचा हा अंश मानवी आरोग्याला कधी नि कोणत्या मार्गाने बाधा पोहोचवेल, याचा काहीच नेम उरलेला नाही. शहरातील माणूस हा आधीच नाना व्याधी आणि दररोजच्या जगण्यातील संघर्षाने ग्रासला असताना वाहतूककोंडीही आजार होऊ शकतो, याची वर्दी कधीचं आपल्याला मिळाली आहे. हे ताणतणाव आपल्यावर कुणी लादले की आपण ओढवून घेतले, मानवी गरजांची यादी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. या गरजपूर्तीसाठी आपण प्रत्येक जण झटत असतो. परंतु, धावपळीत आपण आपल्या जगण्याचा अर्थचं गमावून बसतो. किंबहुना आपला आपल्याशी संवादही तुटून जातो.”
 
 
“आजघडीला वाहतूककोंडी, कौटुंबिक गरजा, महागाई, नोकरी-व्यवसायातील चढउतार, कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरण, परीक्षेतील यश-अपयश, पद-प्रतिष्ठा टिकवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, संततीसुख आदी छोटी-मोठी अनेक कारणे आपल्या ताणतणावाला भर घालत असल्याच्या निष्कर्षापर्यंत आपणच पोहोचलो आहोत. अगदी गरीब-श्रीमंत हा भेदाभेद न पाळता यातील काही गोष्टींची जीवनात बेरीज-वजाबाकी असली तरीही आपण हतबल, निराश होतो. आपल्याला पुढचं सर्व जगच अंधूक, धूसर दिसत जातं. जीवन जगणे ही एक कला आहे, अशी चांगलीचुंगली वाक्य आपल्या मनाला भावतात, स्पर्शून जातात. पण, वास्तवात जगताना पुन्हा आपल्या मनाचा समतोल राखणं आपणचं अधिक गुंतागुंतीच करून घेतो ते अगदी मनात क्षणाक्षणाला निर्माण होत असलेल्या प्रश्नांच्या कोंडीसारखं..”

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content