HomeArchiveम्हाडाचे ८०० कोटी...

म्हाडाचे ८०० कोटी ३ महिन्यांत मिळणार – मधु चव्हाण

Details
म्हाडाचे ८०० कोटी ३ महिन्यांत मिळणार – मधु चव्हाण

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्य सरकारने नुकतीच २६ हजार कोटी रूपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नव्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेची जमीन तत्काळ खरेदी करण्यासाठी सरकारने म्हाडाकडून ८०० कोटींची मागणी केली आहे. सरकार हा निधी तीन महिन्यांत व्याजासह परत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

म्हाडाकडे केलेल्या निधीच्या मागणीला कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला होता. म्हाडाकडे निधीच नसताना पैशांची मागणी करणे अयोग्य असल्याचे सांगत म्हाडातील या कर्मचारी संघटनांनी निधी देण्यास विरोध दर्शविला. मात्र सभापती मधु चव्हाण यांनी त्यांच्या दालनात म्हाडा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून राज्य सरकारला म्हाडाचे ८०० कोटी दिल्याने म्हाडा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर काहीच परिणाम होणार नाही असे स्पष्ट सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८०० कोटी व्याजासहित परत देण्याची हमी दिली असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वेतानासाठी २५ कोटी लागतात आणि म्हाडा वेतन देण्यास समर्थ आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन प्रत्यनशील असून त्यासाठी रेल्वेची जमीन घेण्यासाठी शासनाने म्हाडाकडून ८०० कोटींचा निधी मागितला आहे. हा निधी तीन महिन्यात व्याजासह म्हाडाला परत मिळणार आहे. तसेच शासनाने यापूर्वी म्हाडाकडून विविध प्रकल्पांसाठी घेतलेला निधीही गृहनिर्माण योजनांसाठीच वापरण्यात येणार आहे. म्हाडाकडे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेला निधी लगेचच खर्च होणार नसल्यामुळे म्हाडाची वेगवेगळ्या बँकेत असलेली अनामत रक्कम मोडण्यात येणार असून त्यासाठी बँका तयार असल्याचे ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content