HomeArchiveमहिंद्रा कंपनीमधून जाणारा...

महिंद्रा कंपनीमधून जाणारा डीपी रोड ६ महिन्यांत!

Details
महिंद्रा कंपनीमधून जाणारा डीपी रोड ६ महिन्यांत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

आमदार अतुल भातखळकरांच्या पाठपुराव्याला यश
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत कांदिवली पूर्व लोखंडवाला येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमधून जाणारा समता नगरकडील डीपी रोड येत्या ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतेच कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या मागणीच्या संदर्भात बोलताना दिले.

लोखंडवाला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमधून जाणारा समता नगरकडील डीपी रोड तातडीने पूर्णकरण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी भातखळकर यांनी केली होती. म्हाडा मुख्यालय, वांद्रे येथे गृहनिर्माण मंत्री विखे-पाटील यांनी मुंबईतील विशेषतः मुंबई उपनगरातील सर्व आमदारांबरोबर बैठक बोलावली होती. या बैठकीत कांदिवली पूर्व मतदारसंघातील म्हाडाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केले होते. या प्रश्नांचे निराकरण करून समस्यांसंदर्भात काही महत्त्वाचे आदेश यावेळी देण्यात आले. समता नगर विभागातील डीपी रोड पूर्ण करण्याबरोबरच कांदिवली पूर्व विधानसभेतील म्हाडाच्या काही भूखंडांवर झालेले अतिक्रमण तातडीने दूर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. कांदिवली पूर्व येथील अतिक्रमण झालेल्या भूखंडांवरवरील अतिक्रमण हटवून याठिकाणी निवासी घरे बांधण्यासपरवानगी द्यावी अशी मागणी भातखळकरांनी केली होती. त्याचबरोबर हनुमान नगर विभागातील एसआरए अंतर्गत येणाऱ्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सर्व्हे तसेच पात्र, अपात्रचे निर्णय, अपूर्ण राहिलेले आहेत. हे प्रलंबित प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे आदेश आदेश विखे-पाटील यांनी या बैठकीत दिल्याची माहिती भातखळकर यांनी दिली.”
 
“आमदार अतुल भातखळकरांच्या पाठपुराव्याला यश

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content