Details
बोट आणि खोट..
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगितले होते. आज तेच पंतप्रधान मोदी यांनी पवारांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू करून त्यांना उघडे पाडत आहेत. त्यामुळे पवारांनी आता कायमचा धसका घेतला आहे. आता एखाद्यासमोर बोट पुढे करताना विचार करावा लागेल, असे सांगून त्यांना पश्चाताप झाल्याचे सांगितले. शरद पवार यांना पंतप्रधान होण्यासाठी किती कष्ट करावे लागत आहेत हे महाराष्ट्र पाहत आहे. अजूनही ते पंतप्रधानपदाकडे डोळे लावून आहेत. दुःख एकाच गोष्टीचे.. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि आज ते त्यांच्यावर उलटले. राजकारणात कोणीही कायमचा मित्र व शत्रू नसतो, हे काय नव्याने शरद पवारांना सांगायला नको.
आईवडील मुलाचे बोट पकडून त्याला प्रथम चालायला शिकवितात. त्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कर्ज काढून शिक्षण देतात. तो मुलगा त्याची यशस्वी वाटचाल करून मार्गाला लागतो, तेव्हा आईवडिलांचा आनंद काय असतो याचे वर्णन करता येत नाही. हाच मुलगा यशाच्या पायऱ्या चढत असताना मागे वळून पाहण्यास त्याला वेळ नसतो. एका रेल्वेस्टेशनवर सोनवणे नावाची बाई भीक मागताना एका गृहस्थाला दिसली. बाई भिकारीण वाटत नव्हती. पण तिच्यावर भीक मागण्याची वेळ आली असावी म्हणून एकाने तिला विचारले, ‘तू एवढी धडधाकट आहे, तुझ्या बोलण्यावरून तू चांगल्या सुशिक्षित घरातली वाटतेस, मग भीक का मागतेस?’ असा प्रश्न विचारताच त्या बाईच्या डोळ्यातून पाणी आले. पदराने डोळे पुसतापुसता ती म्हणाली, ‘माझी दोन मुले शिकलेली आहेत, एक बांधकाम विभागात तर दुसराही सरकारी अधिकारी आहे. त्याची बायको डॉक्टर आहे..’ हे ऐकून त्या माणसाला वाईट वाटलं. त्याने कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. नांगरे-पाटील यांनी तिच्या एका मुलाचा शोध घेऊन तिला त्याच्या स्वाधीन केले. त्या माऊलीने नांगरे पाटील यांना सांगितले, ‘साहेब, मला याच्या स्वाधीन केल्यास तो माझा गळा दाबून मारेल’.. अशी जर आई आपल्या वेदना सांगत असेल तर या तिच्या जगण्याला काय अर्थ आहे, अशी तिची ही शोकांतिका ऐकून वाटते. तिने तिच्या दोन मुलांना हातात बोट देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल केलं. पण तिने बोट देऊन खोट खाल्ली.. तिची मुलं फ्लॅटमध्ये आणि ती रेल्वेस्टेशनवर भीक मागत होती. ‘आईविना जग भिकारी’, हे फक्त बोलयाचेच असते. आईबापाची सेवा करणारा श्रावणबाळ आता इतिहासजमा झाला आहे.
शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी शिवसेना स्थापन केली. त्यांनी भायखळ्याला भाजी विकणारे छगन भुजबळ, इन्कम टॅक्स कार्यालयात कारकूनी करणाऱ्या नारायण राणे यांना विश्वासाने बोट देऊन महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर चमकवले. पण छगन भुजबळ यांनी वडीलसमान बाळासाहेबांनाच तुरूंगात टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मॅट्रिक असलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले. आज राणे व त्यांची दोन मुले शिवसेना संपविण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ कोणाला आपलं बोट दिलं म्हणजे ते आपले कायमचे होतात असे नाही. शरद पवारांनी अनेकांना बोट देऊन त्यांचे राजकीय करियर केले. ते आज नरेंद्र मोदी यांना बोट दिल्याबद्दल पश्चाताप करत आहेत. त्यांचे एकेकाळचे पीए, आमदार दिलीप वळसे पाटील नेमके निवडणूक प्रचाराच्यावेळी आजारी पडतात. स्वतः शरद पवार ८० वय गाठत असताना वळसे पाटील स्वतःभोवतीच वळसा घालत आहेत. छगन भुजबळांना त्यांनी बोट दिले तर त्यांची संपत्ती कधी व कशी वाढली आणि राष्ट्रवादीची किती हानी झाली यावर शरद पवार बोलत नाही. निवडणुकीत सोयीचेच बोलायचे असते. नशीब शरद पवारांच्या लक्षात एकलव्याची गोष्ट आली नाही. द्रोणाचार्यांनी तरबेज धनुर्धारी एकलव्याचं गुरूदक्षिणा म्हणून संपूर्ण अंगठाच कापून मागितला. पवारांनी तसं केलं असते तर त्यांनी ज्यांनाज्यांना हातात बोट दिले त्यांनी जाणत्या राजाला अंगठा दाखविला नसता. परिस्थिती बदलली आहे, बोट द्यायचे, पण समोरच्याला गुदगुल्या होतील तीथपर्यंत. नाहीतर अस्वलाच्या गुदगुल्या कायमच्या सहन कराव्या लागतील.”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार