HomeArchiveफिल्मसिटी विकासाच्या उंबरठ्यावर..

फिल्मसिटी विकासाच्या उंबरठ्यावर..

Details
फिल्मसिटी विकासाच्या उंबरठ्यावर..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

महेश पावसकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
तब्बल ४२ वर्षे भारतीय चित्रपटसृष्टीचे जिच्याशिवाय पानही हालणार नाही अशी गोरेगाव पूर्व येथे वसलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी नव्या साजात सजण्याची चिन्हे दिसत आहेत. २६ सप्टेंबर १९७७ रोजी उद्घाटन झालेली ही चित्रनगरी तब्बल ५२१ एकर क्षेत्रफळात वसली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्याच्या हेतूने तिची स्थापना केली असली तरी केवळ विविध चित्रपटांच्या तसेच टीव्ही मालिकांच्या चित्रिकरणासाठी जागा उपलब्ध करून देणे एवढीच माफक अपेक्षा ती आतापर्यंत पूर्ण करू शकली आहे.

२०११ साली या चित्रनगरीला पूर्णपणे आधुनिक व हॉलीवूडच्या धर्तीवर बनविण्याची महत्त्वपूर्ण योजना बनविण्यात आली होती. मात्र त्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी २०१८ साल उजाडावे लागले. जागतिक दर्जाचे भव्य बॉलिवूड म्युझियम, मादाम तुसोंच्या धर्तीवर वॅक्स म्युझियम, फूड कोर्ट, अम्युजमेंट पार्क, मराठी संस्कृती संग्रहालय, बॉलीवूडवर आधारित लाईट आणि साउंड शो, बच्चे कंपनीसाठी मनोरंजन पार्क आणि देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, देशी पर्यटकांसाठी परवडणारी हॉटेल्स, क्लब हाउस अशाप्रकारे अमेरिकेच्या प्रख्यात हॉलीवूड स्टुडियोच्या धर्तीवर सुमारे २५५० कोटी रूपये खर्चून अत्याधुनिक चित्रनगरी उभारण्याचा मानस असल्याची माहिती फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजित मिश्र यांनी दिली.

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई आणि संदीप शिक्रे हे सल्लागार म्हणून या प्रकल्पाचे काम पाहत आहेत. जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र उभारण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या मास्टर प्लानकरिता मागविण्यात आलेल्या निविदांना मुकेश अंबानी यांची रिलायंस इंडस्ट्री, अनिल अंबानी यांची रिलायंस इन्फोटेन्मेंट व भानोत इंफ्रास्ट्रक्चर यांनी प्रतिसाद दिला असून बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर या विकास आराखड्याची आखणी केली आहे.

अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणात ही चित्रनगरी वसली असल्याने चित्रपट व मालिका निर्माते या चित्रनगरीला प्राधान्य देताना दिसतात. तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय मालिकेचा सेट तब्बल १० वर्षांपासून येथे उभा आहे. त्रिशूल सिनेमा ते अगदी अलीकडच्या जोधा अकबर तसेच पद्मावत या चित्रपटांचे चित्रिकरण येथेच झाले होते. कौन बनेगा करोडपती तसेच बिग बॉस हिंदी व मराठी या रियालिटी शोचे भव्य सेट्स येथे उभारलेले आहेत. बाळू मामाच्या नावाने चांगभलं, विष्णू पुराण तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकांचे चित्रिकरण सध्या येथे सुरू आहे.

आजच्या घडीला केवळ १५ स्टुडियो व बाह्य चित्रिकरण स्थळे यांच्या माध्यमातून चित्रनगरीला वर्षाला ७० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती चित्रनगरीचे उप अभियंता चंद्रकांत कोळेकर यांनी दिली. गेली आठ वर्षे केवळ कागदावर राहिलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पास उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमरजित मिश्र यांनी चालना देऊन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून या प्रकल्पास पुढे रेटले आहे. येत्या पाच वर्षांत ती भारतीय चित्रपट सृष्टीचा मानबिंदू ठरेल, असा विश्वास मिश्र यांनी व्यक्त केला.”
 
“महेश पावसकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content