HomeArchiveबालक-पालक शाळा!

बालक-पालक शाळा!

Details
बालक-पालक शाळा!

    09-Dec-2018

| 2

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

स्नेहा कोलते, उपसंपादक, दै. महाराष्ट्र दिनमान

काही महिन्यांपूर्वी दक्षिणेतील एका चित्रपटातील दृश्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. शाळेतील एक मुलगी तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाला भर वर्गात डोळा मारते असे ते दृश्य होते. चर्चा झाली तीत्या मुलीच्या बोल्डनेसची, दिसण्याची आणि डोळा मारण्याची. कुणालाही वाटले नाहीकी शाळकरी वा महाविद्यालयीन वयात, शिकण्याच्या विद्यार्थीदशेत डोळा मारला जातोय हे गैरआहे. सैराटमध्येही शाळकरी वयातीलच प्रेम दाखवले होते. तेथेही याच प्रकारची काहीदृश्ये होतीच..

त्याने प्रेम केलं तिने प्रेम केलं, तुमचं काय गेलं.. हेकवितेत म्हणायला ठिक आहे. पण जेव्हा प्रेम करण्याचे वय शाळकरी असतं, प्रेम म्हणजे प्रेमन राहता त्याला शारीरिक आकर्षणाचे गारूड असते. नकळत्या वयात पीअर प्रेशर अर्थात समवयीन मित्रमैत्रिणींच्या दबावामुळे या गोष्टींना अपरिपक्व मन बळी पडते आणि त्यातून काही भलतेच समोर येते तेव्हा तो सामाजिक प्रश्न बनत असतो. मोबाईल, इंटरनेट, संगणकाच्या सहज उपलब्धतेमुळे या सामाजिक प्रश्नाला समस्येचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. पालकांशी सुसंवाद नसेल किंवा पालकांमध्येच विसंवाद असेल तर त्याला आणखी वेगळे परिमाण मिळते. वयात येण्याचे वय जसे काही वर्षांपूर्वीच बदलले आहे तसेच मुलांमधील प्रेम भावनेचे आविष्कारही बदलले आहेत. हिंसक, आक्रमक स्वरूपात प्रेम प्रकट व्हायला लागले आहे. गृहपाठ, ट्यूशन आदी गोष्टींच्या मागे लागणारी विद्यार्थीदशेतील मुले हल्ली अफेअर, प्रेम प्रकरणांच्यामागे लागल्याने पालक, शिक्षकांनीही चांगलीच धास्ती घेतली आहे.

सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस.हायस्कूलमध्ये असाच एक प्रकार घडला आणि त्यामुळे या विषयाला वाचा फुटली. याशाळेतील एक मुलगा सतत गैरहजर राहत होता. त्याच्या गैरहजेरीमागचे कारण सापडत नव्हते. अखेर शाळेतील समुपदेशकांनी त्याच्याशी संवाद साधला आणि एक धक्कादायक बाबसमोर आली. त्याची एक मैत्रीण त्याच्यामागे लागली असल्याने आणि तिच्या मैत्रिणी ही सतत चिडवत असल्याने हा मुलगा नैराश्यात गेला आणि शाळेची त्याला भीती वाटू लागली. त्यातूनच त्याने शाळेत जाण्यास नकार दिला. हे  झाले एक प्रातिनिधिक उदाहरण. मात्र अशी कित्येक प्रकरणे सध्या प्रत्येक शाळेत घडत आहेत. बदलत्या जगात झपाट्याने बदलत जाणारे नातेसंबंध आणि मोबाईल, इंटरनेट, सिनेमा, टीव्ही यांमुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांना अनोखे एक्स्पोजर मिळत असल्याने पौगंडावस्थेतच विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये अफेअर्स-प्रेमसंबंधांचे प्रमाण वाढते आहे.

नोकरीमुळे आई-वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे त्यांच्यात एक दरी निर्माण होते. या विसंवादामुळे विद्यार्थी मोबाईल, इंटरनेट या आभासी जगालाच आपला साथीदार मानतात आणि आभासी जगातून ज्या गोष्टी शिकता येतात त्याच खऱ्या-खुऱ्या आयुष्यात आत्मसात करतात. वय वर्षे दहा म्हणजे शारीरिक, मानसिक जडणघडणीचा काळ. या बदलाच्या काळात मुलांशी बोलणे, त्यांना त्यांच्यात होणाऱ्या मानसिक, शारीरिक बदलांविषयी समजावणे, लैंगिक शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. मात्र अनेक कारणांनी घरात संवादाचा अभाव असतो आणि बाहेर नको तितके मोहजाल पसरलेले असते. मग मुले नको त्या मार्गाला लागतात. शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून वाहवत जातात. डिस्टर्ब होतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांमधील हा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणे, गप्पा मारणे गरजेचे आहे. दमदाटी करून, मारून विद्यार्थ्यांना मार्गी लावता येत नाही. कारण बालमन अत्यंत नाजूक असते. या काळात मनावर झालेला आघात शेवटपर्यंत कायम राहतो. त्यामुळे त्यांच्या या हळूवार मनाला समजेल, उमजेल अशा शब्दांमध्ये त्यांना घडवणे गरजेचे आहे. हल्ली अनेक महाविद्यालयात समुपदेशन विभाग आहेत. असाच एक विभाग शाळांमध्येही असायला हवा. विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यात होणारा बदल, त्यांच्या प्रगतीत होणारी घसरण पाहून शिक्षकांनी, पालकांनी आपल्या पाल्यांना समुपदेशकाकडे नेण्याची गरज आहे. एकीकडे या वयात मुलांची एकूण विचार प्रक्रिया घडत असते. मुलांची ठाम मते तयार होत असतात तर दुसरीकडे शारीरिक, मानसिक बदलांविषयी त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होत राहतो. या अडनिड्या वयात मुलांना आपल्या बदलत जाणाऱ्या शरीराविषयी, बदलांविषयी पालकांकडून माहिती मिळाली की अनेक प्रश्न सुटतील असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. या वयात लैंगिक आकर्षण निर्माण होणे हे नैसर्गिक आहे. पणया बदलांविषयी त्यांना योग्य समुपदेशनही मिळायला हवे. नाहीतर कृतीतून विकृती निर्माण होऊ शकते. बालभारती, सुलभभारती, किशोरभारती अशी इयत्तांनुसार पुस्तकांची नावे बदलत गेली. मग इयत्तांनुसार विद्यार्थ्यांमधील विचारही बदलत जाणार हे नैसर्गिकच आहे. यानैसर्गिक बदलांकडे पालक कसे पाहातात आणि मुलांशी संवाद कसा वाढवतात यावर नवी पिढीसावरणे अवलंबून आहे..”
 

Continue reading

पुण्याच्या एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पासपोर्ट शिबीर

पुण्याच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयाकडून येत्या 15 ते 17 एप्रिलदरम्यान पुण्याच्याच एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पासपोर्ट (पारपत्र) सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पारपत्रासाठी नियोजित वेळेची सोय लवकर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पारपत्र वितरणसेवा सर्वदूर सहज देता यावी या उद्देशाने परराष्ट्र व्यवहार...

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...
Skip to content