HomeArchiveझाकोळलेले आकाश!

झाकोळलेले आकाश!

Details
झाकोळलेले आकाश!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
ठाणे, पालघर व मुंबईसाठी गेले चार-पाच दिवस तुफानी पावसाची नोंद होत आहे. सूर्याचे दर्शन नाही. बुधवारी गटारी अमावस्या साजरी झाली. खरेतर ती गतआहार अमावस्या आहे असे सांगणारे संदेश समाजमाधम्यांतून मोठ्या प्रमाणात फिरत होते. त्याचा अर्थ इतकाच होता की श्रावण सुरू असताना अनेकांचे उपासतपास असतात. त्या काळात जे अन्न वर्ज्य केले जाते, म्हणजेच जो आहार सोडून द्यायचा असतो, त्या आहाराचे सेवन करण्याचा दिवस म्हणजे गतहारी अवस होय. अर्थात हा श्लेष झाला. कारण सर्वसमान्य जनता गटारीचा अर्थ मासे, मटण व चिकनचा फडशा पाडून पेयाच्या आनंदात धुंद होण्याचा दिवस असाच लावते. पेयानंदात काही महाभाग गटारात लोळण्याचेही पुण्य कमावत असण्याची शक्यता ध्यानात घेऊन जनेतेच्या लेखी या दिवसाचे नाव गटारी असे झाले असल्यास नवल नाही. शिवाय हा दिवस, जसा यावेळी आला तसा, कामाच्या एखाद्या दिवशी आला तरी मंडळी त्याच्या आधला रविवार हा सोईस्कररीत्या, “गताहारी दिवस” ठरवून टाकतात व साजरा करण्याची संधी घेतातच.

त्याच गटारी अवसेच्या दिवशी श्रावणासारखा पाऊस सुरू झाल्याने अनेकांना बरे वाटले. चला मोठ्या पावसामुळे मुंबई, ठाणे परिसर ठप्प होण्याचे, जलमय होण्याचे दिवस संपले. त्या आनंदात काहींनी थोडे अधिकचेही पेयपान करून घेतले असण्याचीही शक्यता दाट आहे. पण आणखी दोनच दिवस उलटतात तोच पावसाने पुन्हा दिशा फिरवल्याचे स्पष्ट झाले. “श्रावणमासी हर्ष मानसि, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे” या बालकवींच्या शब्दांवर असणारा आपला विश्वास उडून जावा असा हा श्रावण बरसू लागलेला आहे. तो थांबण्याचे नावच घेत नाही. मुंबईच्या अनेक सखल भागात संपलेल्या सप्ताहाच्या अखेरीच्या दिवसात पाणीच पाणी चहुकडे अशी स्थिती तयार झाली होती. मुंबईकर मोहन या पावसात हरवूनच गेलेला आहे. आकाशाची निळाई जणू हरवूनच गेलेली आहे. फिकट रंगाचे ढग कुठेच दिसत नाहीत आणि दाट काळ्या ढगांमुळे सर्वत्र काळोख दाटून आल्यासारखी स्थिती दिसत आहे. रात्रभर पाऊस कोसळतोच आहे. गेल्या चोवीस तासांत पावसाने ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडून पुढे वाटचाल सुरू केली आहे. ठाणे शहर, कल्याण, शहापूर, सर्वत्र पावसाने सध्याच वार्षिक सरासरी ओलांडून पुढे वाटचाल सुरू ठेवली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीच्या 107 ते 110 टक्के पाऊस झाल्याचे वेधशाळेचे निरीक्षण आहे.

या साऱ्या वातावरणातही तिकडे मराठवाड्यात मात्र अद्यापी पावसाने पाठच फिरवेली दिसते. तिकडे धरणे व तलाव अगदी कोरडे नसले तरी, फार भरलेलेही नाहीत. भिज पाऊस, भुरभुर पाऊस अशीच पावसाची मध्यम आवर्तने मराठवाड्याच्या बहुतेक जिल्ह्यांतून सुरू आहेत. या वातावरणात पेरण्या तरी कशी होणार व पिके आली तरी कशी येणार या चिंतेत तिथला बळीराजा पडलेला आहे. मराठवाड्यातील काही उत्साही मंत्र्यांनी कृत्रिम पावसाच्या घोषणाही करून टाकल्या होत्या. दोनदा ढगांमध्ये पाऊस पेरणी करणारी विमाने उडालीही होती. पण मराठवाड्यावरच्या ढगांमध्ये पाणीच नाही असे जाणवल्यामुळे ती विमाने आली तशीच माघारी फिरली. कृत्रिम पावसासाठी ढगांमध्ये विमानाद्वारे काही रसायनांची फवारणी केली जाते. मिठासारख्या या रसायनांच्या कणांभोवती ढगातील वाफेचे कण जमून त्याचे रूपांतर पावसाच्या थेंबात होऊ शकते आणि तिथे आधी न दिसणारा पाऊस अवतरू शकतो असे हे तंत्रज्ञान आहे. त्याचे प्रयोग जगात अनेक ठिकाणी यशस्वीही होतात. आपल्याकडे सांगली, सातारा भागात काहीवेळा या कृत्रिम वापसाचे प्रयोग केले गेले आहेत. पण त्याला मिळणारे यश हे तितकेच मर्यादित असते. तसेच ते याही वेळी न म्हणावे असेच राहिले.

मुंबई परिसरातील या झाकोळलेल्या आकाशाला अधिक गहिरे व गडद करण्याचे काम पांडवकड्याने केले आहे. नवी मुंबई परिसरात पांडवकडा धबधबा प्रसिद्ध आहे. उंचावरून खळाळत येणाऱ्या पाण्याच्या ओघाने कड्यावरून उडी मारली की धबधब्याचे जे मनोहारी दृष्य तयार होते त्याचे आकर्षण आपल्या सर्वांनाच असते. तसेच ते या तरूण-तरूणींनाही होते. सात-आठ विद्यार्थ्यांचा एक जत्था या पांडवकड्याकडे शनिवारी गेला व त्यातील चार तरूणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. ही घटना दुर्दैवी तर आहेच पण त्याहूनही तरूणाईच्या बेजबाबदारपणाचे दर्शन घडवणारी, या अर्थाने दुःखदायक, क्लेषदायक अशीही आहे. नवी मुंबईतील खारघर परिसर हा अनेक व्यावसायिक शिक्षण संस्थांसाठी विख्यात आहे. तिथल्या या धबधब्याकडे जाण्याचा निर्णय या मुलांनी घेतला. पण, नवी मुंबई पोलिसांनी तिथे लावलेल्या सूचनाफलकांकडे मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पांडवकडा धबधब्यात जाणे म्हणजे मृत्यूला निमंत्रणच ठरते. गेल्या काही वर्षांत दहा-बारा कोवळे जीव या धबधब्याचे बळी ठरले आहेत.

तसा हा डोंगर परिसर मानवी वस्तीपासून फार दूर नाही, अगदीच जंगलही नाही वा निर्मनुष्य असाही हा भाग नाही. पण पांडवकड्याकडे जाणारे मुख्य मार्ग पोलिसांनी गेल्या तीन वर्षांपासून बंद ठेवले आहेत. पावसाळ्यात तिथे जाणे हे मृत्यूला निमंत्रणच ठरते हा अनुभव आलेला आहे. पण तरीही नवी मुंबईतील एसआयईएस महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणारी काही मुले व मुली यांनी त्याच धोकादायक ठिकाणी जाण्याचे ठरवले. त्यासाठी नेहमीचे रस्ते सोडून आडमार्गाकडे ते वळले. त्यातील बहुतेकांनी कॉलेजला जातो असे खोटेच सांगून घरातून कूच केले होते. पांडवकड्याकडे पावसाळी सहलीला जातो असे त्यांनी कुणीही पालकांना सांगितले नव्हते. ही मुले खारघर गोल्फ क्लबच्या बाजूने कड्याकडे जाण्याऱ्या रस्त्यावर उतरली. पाण्याचा एक प्रवाह ते ओलांडून पलिकडे धबधबा कोसळतो त्याच्याजवळ निघाले होते. या झऱ्यात तीन फूट पाणी होते. मजेत तो ओलांडत असताना सकाळी साडेआठ, नऊच्या सुमारास डोंगरावरून अचानक पाण्याचा लोंढा आला व त्यात ही सारीच पोरं वाहून गेली. पण त्यातील चौघांनी एकमेकांना सावरले. दोन मुले व दोन मुली बाहेर पडू शकले. चार मुली व एक त्यांच्यासोबत आलेला वाशीचा रिक्षावाला मात्र वाहून गेले. त्यातील रिक्षावाला एका मोठ्या दगडाच्या आधाराने कसाबसा वाचला. पण त्या चौघींपैकी तिघींचे मृतदेह दोन-तीन किलोमीटर खाली सापडले. चौथ्या मुलीच्या मृतदेहाचा पत्ता लागला नाही अथवा ती जिवंत परतही आली नाही. पालकांच्या काळजाचा थरकाप उडवणारी ही सारी हकीकत आहे. मुंबई परिसरातली पालकांनी जागरूक तर राहिलचे पाहिजे पण राज्यातील सर्वत्र पालकांनी आपापल्या पाल्यांना विश्वासात घेऊन पावसाळ्याचा आनंद लुटताना निदान प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तरी पालन केलेच पाहिजे हे बजावायला हवे, हेच सांगणारी ही घटना आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे अशा पावसाळी साहसांबाबतीत मात्र होताना दिसत नाही हे दुर्दैवच आहे.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content