Details
“.. पण, मोडला नाही कणा!”
09-Sep-2019
”
अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
देशाच्या प्रत्येक गावातील, शहरातील, महानगरांतील अनेक घरांमध्ये, शुक्रवारी रात्री दिवे विझलेच नाहीत. मंडळी जागीच होती. टीव्हीच्या पडद्याला डोळे आणि कान खिळवून पाहत होती. पहाटे दीडनंतर चांद्रयान मोहिमेचे शेवटचे पर्व सुरू झाले. मोहिमेचे प्रमुख, इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी वारंवार याच अखेरच्या काही मिनिटांचा उल्लेख, ‘ती सर्वात भयकारी पंधरा मिनिटे’ असा केला होता, तीच मिनिटे सुरू होती. सुरूवातीचे सर्वच टप्पे यशस्वीरीत्या पार करणारे आपले चांद्रयान अखेरचा टप्पा नीटच पार करणार याची खात्री होती. पण अगदी शेवटच्या क्षणी कुठेतरी माशी शिंकली. चंद्राच्या भूमीपासून दोन किलोमीटर उंचीवर विक्रम लॅंडर असताना त्याचा व बेंगळुरूमधील मिशन कंट्रोल सेंटरचा संपर्क तुटला. सर्वांच्याच छातीत धस्स झाले. काही मिनिटे वाट पाहण्यात गेली. पण, अखेर हे स्पष्ट झाले की, लँडर चंद्रावर प्रत्यक्षात उतरले की नाही ते इथे आपल्याला कळू शकलेले नाही.
शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यांवरची निराशा लपत नव्हती. काहींच्या डोळ्यांत अश्रूही दाटलेले दिसले. देशाच्या कनाकोपऱ्यांत रात्र जागवून त्या क्षणाची वाट पाहणाऱ्यांपैकी काहींनी निराशेने टीव्ही संच बंदही केले असतील. पण हे विसरताच येणार नाही की, त्या क्षणापर्यंतचा चांद्रयानाच्या प्रवासाचा तो सारा थरार आपण सारेच अनुभवत होतो. त्याचा आनंदही घेत होतो. बेंगळुरूच्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये बसलेल्या, उभ्या असणाऱ्या, उत्सुकतेने डोळे व कान ताणून निरीक्षण करणाऱ्या साऱ्यांसाठी तो एक अतिशय तीव्र असा धक्कादायक क्षण होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे स्वतः उपस्थित होते. रशियाचा दोन दिवसांचा दौरा आटोपून, नेमके चांद्रयान अंतिम प्रवास पूर्ण करण्याचा क्षण शास्त्रज्ञांसमवेत साजरा करण्यासाठी, ते पोहोचले होते.
चांद्रयान-२ मोहिमेची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी शास्त्रज्ञांना देशाच्या सर्वोच्च नेत्यांचे पाठबळ लाभले होते. भारताच्या सर्वच पंतप्रधानांनी आजवर भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या पाठीशी राहण्याचे काम केले आहे. पंडित नेहरूंपासूनची ही पंरपरा आहे. अवकाश संशोधन खाते नेहमीच पंतप्रधानांकडे असते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री या नात्याने इस्त्रोच्या कामकाजाशी संबंधित राहिले होते. पण, तरी खात्याचे प्रभारी मंत्री होते पंतप्रधान डॉ. सिंहच. डॉ. मनमोहन सिंह यांनीच मंगळयान मोहिमेच्या संकल्पनेला भारत सरकारचे बळ दिले होते आणि त्यांच्याच कालावधीत चांद्रयान-१, ही मोहीम आखली गेली होती. पारही पडली होती. पण पुढच्या चांद्रयान-२ मोहिमेला मुहूर्त लाभला तो मोदींच्या पहिल्या कारकीर्दीमध्ये. मोदींनी इस्त्रोच्या कार्यामागे भारत सरकारची सारी शक्ती उभी केली. इस्त्रोच्या मागणीनुसार पैसा दिला. जिथे आवश्यकता होती तिथे परदेशी मदत मिळवून दिली. जिथे परदेशांना इस्रोचे सहकार्य लागत होते तेही उपलब्ध करण्यात भारत सरकार उभे राहिले. शास्त्रज्ञांच्या कार्यात जी काही प्रशासकीय मदत लागते ती सारीच मोदी सरकारने दिली. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मंगलयान उडाले. ती मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद देशाने साजरा केला.
त्याचवेळी चांद्रयान-२ संकल्पाची घोषणा झाली. पुढच्या कालावधीत भारताच्या अंतराळ मोहिमेमध्ये मानवसहित याने उडवली जातील, अशी घोषणाही मोदींच्या पहिल्या कार्यकाळात झाली. त्याची तयारी सुरू झाली. चांद्रयान-२ मोहीम भारताच्या अवकाश कौशल्यावर यशाची मोहोर उमटवणारी ठरावी, अशीच देशाची इच्छा होती. पण, दुर्दैवाने अखेरच्या काही क्षणांमध्ये शेवटच्या काही मिनिटांच्या प्रवासात विक्रम लॅंडरचा व मिशन कंट्रोल सेंटरचा संपर्क तुटला. पहाटे मिशन कंट्रोल सेंटरमधून बाहेर पडतानाही पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले. चंद्र भारताने मुठीत घेतला हे साभिमान नमूदही केले. पण सकाळी पुन्हा त्याच मिशन सेंटरमध्ये जाऊन मोदींनी शास्त्रज्ञांशी खुला संवाद साधला. तो साऱ्या देशाने पाहिला, अनुभवला. त्यात पंतप्रधानांनी आवर्जून हे नमूद केले की, मोहिमेचा उद्देश सफलच झालेला आहे. भारताने चंद्राला गवसणी घातलेलीच आहे. विज्ञानाचा प्रवास एक निरंतर शोध असतो. त्यात एक ध्येय्य साध्य होते तेव्हा पुढच्या ध्येय्याच्या खुणा दिसू लागलेल्या असतात. सातत्याने पुढे काय, याचा शोध सुरू असतो. सातत्याने एका प्रयोगानंतरच्या पुढच्या प्रयोगाचा ध्यास घेतला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, ज्या पद्धतीने हा सारा विषय सकाळी इस्त्रोच्या थोड्या निराश झालेल्या तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांपुढे मांडला त्याला तोड नाही.
पहाटेच्या घटनांनी इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेचे सारेच शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ निराश नक्कीच झाले असतील. पण, देश त्यांच्यामागे उभा आहे. पुढे आपल्याला आणखी यश मिळणारच आहे. तुमच्या सध्याच्या मोहिमेनेही देशाला अभिमानाचे, सुखाचे अनेक क्षण नक्कीच दिले आहेत, हे देशाच्या पंतप्रधानांनी तिथे जाऊन देशाच्या वतीने सांगणे अत्यंत महत्त्वाचे होते. शास्त्रज्ञांच्या कोसळत्या मनस्थितीला तो एक मोठा आधार हवा होता तो मोदींन दिला, याबद्दल देशाने मोदींचेही अभिनंदनच केले. सुरूवातीच्या काही तासांत तरी सर्वच विरोधी पक्षनेत्यांनी शास्त्रज्ञांच्या मागे आपण उभे आहोत, याचे संदेश ट्विटरच्या माध्यमातून दिले. काही मोदी विरोधकांना त्यातही राजकारण खुणावू लागले. जसजसा दिवस वर चढत गेला तसतसे मोदी विरोधक जागे झाले आणि त्यांनी अशा बाता मारायला सुरूवात केली की, शास्त्रज्ञांच्या यशाचे श्रेय लुबाडण्यासाठीच मोदी मिशन कंट्रोल सेंटरमध्ये गेले होते. पण, तसे म्हणणे हा मोदींवर अन्याय तर आहेच, पण पंतप्रधानांच्या रूपाने देश आपल्यामागे उभा आहे, ही जी दिलासादायक भावना इस्त्रोला वाटली असेल, त्यात एक मिठाचा खडा टाकणे आहे. असे विझवटे धंदे कुणीच करू नयेत. खरेतर झालेले कार्यही पुरेसे उत्तुंग आहे. अत्यंत कमी पैशात इतकी मोठी झेप भारतीय अवकाश शास्त्रज्ञांनी घेतली ती कौतुकास्पदच आहे. जगातील तज्ज्ञ यासाठी भारतीय संशोधकांचे कौतुक करत आहेत. मोदींच्या विरोधासाठी त्यांच्या भावना कलुषित करण्याचे पाप निदान भारतीयांनी तरी करू नये.”
अनिकेत जोशी..
“संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com ”
“देशाच्या प्रत्येक गावातील, शहरातील, महानगरांतील अनेक घरांमध्ये, शुक्रवारी रात्री दिवे विझलेच नाहीत. मंडळी जागीच होती. टीव्हीच्या पडद्याला डोळे आणि कान खिळवून पाहत होती. पहाटे दीडनंतर चांद्रयान मोहिमेचे शेवटचे पर्व सुरू झाले. मोहिमेचे प्रमुख, इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी वारंवार याच अखेरच्या काही मिनिटांचा उल्लेख, ‘ती सर्वात भयकारी पंधरा मिनिटे’ असा केला होता, तीच मिनिटे सुरू होती. सुरूवातीचे सर्वच टप्पे यशस्वीरीत्या पार करणारे आपले चांद्रयान अखेरचा टप्पा नीटच पार करणार याची खात्री होती. पण अगदी शेवटच्या क्षणी कुठेतरी माशी शिंकली. चंद्राच्या भूमीपासून दोन किलोमीटर उंचीवर विक्रम लॅंडर असताना त्याचा व बेंगळुरूमधील मिशन कंट्रोल सेंटरचा संपर्क तुटला. सर्वांच्याच छातीत धस्स झाले. काही मिनिटे वाट पाहण्यात गेली. पण, अखेर हे स्पष्ट झाले की, लँडर चंद्रावर प्रत्यक्षात उतरले की नाही ते इथे आपल्याला कळू शकलेले नाही.”
“शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यांवरची निराशा लपत नव्हती. काहींच्या डोळ्यांत अश्रूही दाटलेले दिसले. देशाच्या कनाकोपऱ्यांत रात्र जागवून त्या क्षणाची वाट पाहणाऱ्यांपैकी काहींनी निराशेने टीव्ही संच बंदही केले असतील. पण हे विसरताच येणार नाही की, त्या क्षणापर्यंतचा चांद्रयानाच्या प्रवासाचा तो सारा थरार आपण सारेच अनुभवत होतो. त्याचा आनंदही घेत होतो. बेंगळुरूच्या मिशन कंट्रोल सेंटरमध्ये बसलेल्या, उभ्या असणाऱ्या, उत्सुकतेने डोळे व कान ताणून निरीक्षण करणाऱ्या साऱ्यांसाठी तो एक अतिशय तीव्र असा धक्कादायक क्षण होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे स्वतः उपस्थित होते. रशियाचा दोन दिवसांचा दौरा आटोपून, नेमके चांद्रयान अंतिम प्रवास पूर्ण करण्याचा क्षण शास्त्रज्ञांसमवेत साजरा करण्यासाठी, ते पोहोचले होते. ”
“चांद्रयान-२ मोहिमेची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी शास्त्रज्ञांना देशाच्या सर्वोच्च नेत्यांचे पाठबळ लाभले होते. भारताच्या सर्वच पंतप्रधानांनी आजवर भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या पाठीशी राहण्याचे काम केले आहे. पंडित नेहरूंपासूनची ही पंरपरा आहे. अवकाश संशोधन खाते नेहमीच पंतप्रधानांकडे असते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात महाराष्ट्राचे नेते पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री या नात्याने इस्त्रोच्या कामकाजाशी संबंधित राहिले होते. पण, तरी खात्याचे प्रभारी मंत्री होते पंतप्रधान डॉ. सिंहच. डॉ. मनमोहन सिंह यांनीच मंगळयान मोहिमेच्या संकल्पनेला भारत सरकारचे बळ दिले होते आणि त्यांच्याच कालावधीत चांद्रयान-१, ही मोहीम आखली गेली होती. पारही पडली होती. पण पुढच्या चांद्रयान-२ मोहिमेला मुहूर्त लाभला तो मोदींच्या पहिल्या कारकीर्दीमध्ये. मोदींनी इस्त्रोच्या कार्यामागे भारत सरकारची सारी शक्ती उभी केली. इस्त्रोच्या मागणीनुसार पैसा दिला. जिथे आवश्यकता होती तिथे परदेशी मदत मिळवून दिली. जिथे परदेशांना इस्रोचे सहकार्य लागत होते तेही उपलब्ध करण्यात भारत सरकार उभे राहिले. शास्त्रज्ञांच्या कार्यात जी काही प्रशासकीय मदत लागते ती सारीच मोदी सरकारने दिली. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मंगलयान उडाले. ती मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद देशाने साजरा केला.”
“त्याचवेळी चांद्रयान-२ संकल्पाची घोषणा झाली. पुढच्या कालावधीत भारताच्या अंतराळ मोहिमेमध्ये मानवसहित याने उडवली जातील, अशी घोषणाही मोदींच्या पहिल्या कार्यकाळात झाली. त्याची तयारी सुरू झाली. चांद्रयान-२ मोहीम भारताच्या अवकाश कौशल्यावर यशाची मोहोर उमटवणारी ठरावी, अशीच देशाची इच्छा होती. पण, दुर्दैवाने अखेरच्या काही क्षणांमध्ये शेवटच्या काही मिनिटांच्या प्रवासात विक्रम लॅंडरचा व मिशन कंट्रोल सेंटरचा संपर्क तुटला. पहाटे मिशन कंट्रोल सेंटरमधून बाहेर पडतानाही पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले. चंद्र भारताने मुठीत घेतला हे साभिमान नमूदही केले. पण सकाळी पुन्हा त्याच मिशन सेंटरमध्ये जाऊन मोदींनी शास्त्रज्ञांशी खुला संवाद साधला. तो साऱ्या देशाने पाहिला, अनुभवला. त्यात पंतप्रधानांनी आवर्जून हे नमूद केले की, मोहिमेचा उद्देश सफलच झालेला आहे. भारताने चंद्राला गवसणी घातलेलीच आहे. विज्ञानाचा प्रवास एक निरंतर शोध असतो. त्यात एक ध्येय्य साध्य होते तेव्हा पुढच्या ध्येय्याच्या खुणा दिसू लागलेल्या असतात. सातत्याने पुढे काय, याचा शोध सुरू असतो. सातत्याने एका प्रयोगानंतरच्या पुढच्या प्रयोगाचा ध्यास घेतला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, ज्या पद्धतीने हा सारा विषय सकाळी इस्त्रोच्या थोड्या निराश झालेल्या तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांपुढे मांडला त्याला तोड नाही.”
“पहाटेच्या घटनांनी इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेचे सारेच शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ निराश नक्कीच झाले असतील. पण, देश त्यांच्यामागे उभा आहे. पुढे आपल्याला आणखी यश मिळणारच आहे. तुमच्या सध्याच्या मोहिमेनेही देशाला अभिमानाचे, सुखाचे अनेक क्षण नक्कीच दिले आहेत, हे देशाच्या पंतप्रधानांनी तिथे जाऊन देशाच्या वतीने सांगणे अत्यंत महत्त्वाचे होते. शास्त्रज्ञांच्या कोसळत्या मनस्थितीला तो एक मोठा आधार हवा होता तो मोदींन दिला, याबद्दल देशाने मोदींचेही अभिनंदनच केले. सुरूवातीच्या काही तासांत तरी सर्वच विरोधी पक्षनेत्यांनी शास्त्रज्ञांच्या मागे आपण उभे आहोत, याचे संदेश ट्विटरच्या माध्यमातून दिले. काही मोदी विरोधकांना त्यातही राजकारण खुणावू लागले. जसजसा दिवस वर चढत गेला तसतसे मोदी विरोधक जागे झाले आणि त्यांनी अशा बाता मारायला सुरूवात केली की, शास्त्रज्ञांच्या यशाचे श्रेय लुबाडण्यासाठीच मोदी मिशन कंट्रोल सेंटरमध्ये गेले होते. पण, तसे म्हणणे हा मोदींवर अन्याय तर आहेच, पण पंतप्रधानांच्या रूपाने देश आपल्यामागे उभा आहे, ही जी दिलासादायक भावना इस्त्रोला वाटली असेल, त्यात एक मिठाचा खडा टाकणे आहे. असे विझवटे धंदे कुणीच करू नयेत. खरेतर झालेले कार्यही पुरेसे उत्तुंग आहे. अत्यंत कमी पैशात इतकी मोठी झेप भारतीय अवकाश शास्त्रज्ञांनी घेतली ती कौतुकास्पदच आहे. जगातील तज्ज्ञ यासाठी भारतीय संशोधकांचे कौतुक करत आहेत. मोदींच्या विरोधासाठी त्यांच्या भावना कलुषित करण्याचे पाप निदान भारतीयांनी तरी करू नये.”

