HomeArchiveपाणबुडी खंदेरीत मोठ्या...

पाणबुडी खंदेरीत मोठ्या त्रुटी!

Details

विनय गजानन खरे..
 
 

“भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिअन बनावटीच्या सहा पाणबुड्या सामील करण्याच्या दृष्टीने वेगाने पाऊले टाकली गेली. पण, अद्यापही त्या नियोजित वेळेपेक्षा खूपच मागे आहेत. त्यातील आयएनएस कलवरी वगळता अन्य पाणबुड्या दाखल झालेल्या नाहीत. खंदेरी यावर्षीच्या सुरूवातीस दाखल होईल, असे म्हटले गेले होते. पण, प्रत्यक्षात तसे झाले नाही. कारण, मोठया प्रमाणात कमतरता आणि त्रुटी आढळल्याने अंतिम तपासणीवेळी त्यांना नकार देण्यात आला. माझगाव डॉकमध्ये हा प्रोजेक्ट ७५ सुरू असून गोदीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे असं वरिष्ठ स्तरावर बोललं जातंय. वास्तविक या गोदीने देशाला अनेक युद्धनौका पुरवल्या आहेत. त्यामुळे खंदेरी सामील होण्यास अजून वर्षभराचा कालावधी लागणार हे निश्चितच! दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी ऑक्टोबर अखेर ती दाखल होईल असं म्हंटलंय.
 
 ”

“भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिअन बनावटीच्या सहा पाणबुड्या सामील करण्याच्या दृष्टीने वेगाने पाऊले टाकली गेली. पण, अद्यापही त्या नियोजित वेळेपेक्षा खूपच मागे आहेत. त्यातील आयएनएस कलवरी वगळता अन्य पाणबुड्या दाखल झालेल्या नाहीत. खंदेरी यावर्षीच्या सुरूवातीस दाखल होईल, असे म्हटले गेले होते. पण, प्रत्यक्षात तसे झाले नाही. कारण, मोठया प्रमाणात कमतरता आणि त्रुटी आढळल्याने अंतिम तपासणीवेळी त्यांना नकार देण्यात आला. माझगाव डॉकमध्ये हा प्रोजेक्ट ७५ सुरू असून गोदीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे असं वरिष्ठ स्तरावर बोललं जातंय. वास्तविक या गोदीने देशाला अनेक युद्धनौका पुरवल्या आहेत. त्यामुळे खंदेरी सामील होण्यास अजून वर्षभराचा कालावधी लागणार हे निश्चितच! दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी ऑक्टोबर अखेर ती दाखल होईल असं म्हंटलंय.”
 
 

“भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकारी चमूने खंदेरीची काटेकोर तपासणी अलिकडेच केली. त्यावेळी वेगवेगळ्या पातळीवर कमतरता आढळून आल्या. संरक्षणविषयक अनेक प्रकल्प नियोजित वेळेपेक्षा मागे पडतात. हा अनुभव असल्याने माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि त्यांच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्यासाठी कंबर कसली होती, त्यानुसार पाणबुडी कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न चालवला होता. एकापाठोपाठ एक अशा सहा पाणबुड्या वर्ष-सहा महिन्यांच्या अंतराने येतील, असं वाटत असताना ही बाब समोर आल्याने पाणबुडी निर्मिती कार्यक्रमात खोडा आल्याचं मानलं जातंय. तथापि, गोदीतील वरिष्ठ सूत्रानुसार इतर पाणबुड्यांचं काम व्यवस्थित सुरू असून त्यात खंड पडलेला नाही. नौदलाने निदर्शनास आणलेल्या त्रुटी-कमतरता लवकरात लवकर दूर करून खंदेरीचा ताबा सोपविण्यास आम्हीही उत्सुक आहोत असं सांगत याबाबत अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.
 
 ”

“संरक्षण मंत्रालयाने नौदलाच्या आद्ययावतीकरणासाठी पूर्ण पाठिंबा दिला असून त्यानुसार एमडीएल आणि युद्धनौका बनवणारी फ्रान्सची नेव्हल ग्रुप कंपनी काम करीत आहे. त्यानुसार समुद्रसखी युद्धात बलाढ्य ठरेल, अशी नौकाबांधणी केली जातेय. पूर्ण क्षमतेने काम करणारी पाणबुडी देणे ही या कंपनीची जबाबदारी आहे. काही त्रुटींसह बोट स्वीकारल्यास आमच्यावर ती जबाबदारी येऊन ठपकाही येईल, असं एक नौदल अधिकाऱ्याने सांगितलं. युद्धकाळात पाणबुडीची परिणामकारकता आणि तिचे अस्तित्त्व हे तिचा थांगपत्ता न लागण्यावर अवलंबून असतो. शत्रूची सोनार यंत्रणा, जी युद्धनौका, लढाऊ विमानं आणि पाणबुड्यांवर बसवलेली असते, ती विशिष्ट आवाज कुठून येतो याचा अथक शोध घेत असते. एकदा का शत्रूला त्याचा सुगावा लागला की त्या दिशेने टोरपेडो किंवा अन्य शस्त्रांचा मारा झालाच समजा. खंदेरीचा मोठा आवाज हाच एकमेव मुद्दा तिच्या नकारासाठी नव्हता तर अन्य ३५ मुद्देही होते. तिला ताफ्यात दाखल करण्यापूर्वी त्यात पूर्णतः दुरूस्ती व्हावी, ही मागणी नौदलाने केली आहे. मात्र, याकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही. त्यापैकी २९ समस्या दूर करण्यासाठी समुद्र शांत असणं आवश्यक आहे किंवा समुद्री नौवाहन परिभाषेत तो दर्जा एकचा असायला हवा. गेल्या दोन महिन्यांत यावर काही काम झालं नसून सप्टेंबर अखेरच कामाला सुरूवात होऊ शकते असं सूत्रांनी स्पष्ट केलं.
 
 ”

“इतर चार बाबींवर पाणबुडी गोदीत असताना चाचण्या तपासणी होणे गरजेचं आहे. पण, हे इतर लढाऊ बोटीच्या वेळापत्रकानुसार होऊ शकते. या प्रकल्प-७५ मधील करंज पाणबुडीच्या ट्रायल्स नुकत्याच सुरू झाल्यात. मात्र, तिच्यातही खंदेरीसारखे काही प्रोब्लेम्स आहेत का, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, माझगाव गोदी आणि नौदलाकडून अधिकृतपणे कोणीही काही बोलत नाही. खंदेरीच्या त्रुटींवरही सांगितले जात नाही. जिथे २४ ची आवश्यकता असता केवळ १४ पारंपरिक पाणबुड्यांवर हवाला ठेऊन काम केलं जातंय. तशातच खंदेरी-करंजला अजून विलंब लागणे धोकादायक ठरू शकते. कारण, दक्षिणेला चीनच्या आरमाराची वाढती गस्त अमेरिका, जपान आदी देशांना सतावतेय. श्रीलंका आणि इतर देशांच्या मदतीने तिथे तळ उभारून चीन आपला दबाव वाढवतोय. जागतिक व्यापाराचा ८०% माल याच परिसरातून जात असल्याने चीनला अटकाव करण्यास भारतीय नौदल प्रबळ असण्याची गरज सर्वांना भासतेय.”

 
 

 
 

गेल्या काही काळात नौदलाच्या अणू पाणबुड्या आयएनएस अरिहंत आणि रशियाची करारावर घेतलेली आयएनएस चक्र अपघातामुळे कार्यरत नाहीत. २००५ साली प्रकल्प-७५ माझगाव डॉकशी १८ हजार ७९८ कोटी रूपयांचा करार करून सहा पारंपरिक पाणबुडींची बांधणी सोपवण्यात आली. फ्रॅंको स्पॅनिश कांसोर्टीअम अरमारीसने तंत्रज्ञान हस्तांतरणासह सहा स्कॉर्पिअन पाणबुड्या २०१२-२०१५ या कालावधीत देण्याचं नमूद होतं. पण, आता सहावी ताब्यात येण्यास २०२२ उजाडेल असं सांगितलं जातं. दरम्यानच्या, काळात ही कंपनी फ्रान्सच्या डीसीएनएसने ताब्यात घेतली. पुढे याची रक्कम २३ हजार ५६२ कोटी रूपये इतकी झाली. तर २०१७ साली कंपनीने नाव बदलून नेव्हल ग्रुप केलं.
 
 ”

“सध्या आयएनएस कलवरी वगळता इतर १४ पाणबुड्यांपैकी चार २०-३० वर्षे जुन्या आहेत. त्या जर्मन बनावटीच्या एचडीडब्ल्यू ८७७ ekm ज्यांना सिंधुघोष क्लास तर दहा ते वीस वर्षे जुन्या रशियन किलो क्लास शिशुमार क्लास बनावटीच्या आहेत. यात अजून पाच स्कॉर्पिअन आणि सहा पारंपरिक बनावटीच्या पाणबुडी प्रोजेक्ट ७५ आय अंतर्गत बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी भारतीय कंपनी परदेशी सहकार्याने बांधेल, अशी शोधली जात आहे. याची निविदाप्रक्रिया अद्याप सुरू व्हायचीय असं दिल्लीतून सांगण्यात आलं. स्वदेशी बनावटीच्या पाणबुड्यांचा प्रकल्प संथ गतीने चालला असून अणूसंचालित पाणबुडीबाबत गतीने काही होत नाही. या पार्श्वभूमीवर भारत आणि रशिया यांच्यात पाणबुडी भाडेकरार झाला आहे. ती १० वर्षांसाठी २०२५ साली ताफ्यात दाखल होईल. सध्या आयएनएस चक्र ही तिकडचीच आहे. तिचा भाडेकरार एक लाख बिलिअन डॉलरचा असून ती २०१२ साली घेतली होती. ती २०२२ मध्ये परत जाईल. मात्र, संरक्षण मंत्रालय सूत्रांनुसार, तिचा करार पुढील ‘चक्र’ बांधून दाखल होईपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे.
 
 ”

“मागील मे महिन्यात वेला हिला माझगाव गोदीतून पाण्यात ढकलण्यात आले. चाचण्या यशस्वी झाल्यावर ती दाखल केली जाईल. स्कॉर्पिअन गटातील उर्वरित दोन २०२१ च्या मध्यात मिळतील. सध्या त्या बांधणीच्या जवळपास शेवटच्या टप्प्यात आहेत. बंदर नि समुद्रात पूर्ण कसोटीला उतरल्यावरच तिला सामावून घेतले जाणार आहे. पाण्यातील सोनार यंत्रणेपासून शोधप्रक्रिया रोखण्यासाठी बचावयंत्रणा तिला स्टेल्थ म्हणतात. मात्र तिने टोरपेडो डागल्यास तिचा शत्रू माग काढू शकतो. यासाठी आवाज कमीतकमी असणारे इंजिनही आवश्यक असते. या दाखल होणाऱ्या स्कॉर्पिअनमध्ये ‘परमनंटली मॅग्नेटाइज प्रॉपलशन मोटर, बसवलेली असते. यामुळे पाणबुडीची गती समुद्र खोलीत २० नॉट्स तर (३७ किमी प्रति तास) समुद्र सपाटीवर १२ नॉट्स (२२ किमीप्रती) इतकी असते. याचे प्रामुख्याने हत्यार टोरपेडो असून नौदलाने ‘ब्लॅक शार्क’ या इटालियन वास कंपनीची निवड केलीय. मात्र, आगस्ता वेस्टलँड या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने संरक्षण मंत्रालयाने संबंधित कंपन्यांकडून खरेदी बंद केली आहे.
 
 ”

“जुन्या जहाज, बोटींची आठवण म्हणून नव्यानेच येणाऱ्यांना तीच नावं देण्याची प्रथा नौदलात आहे. रशियन फॉक्सट्रॉट क्लासच्या १९६७-६९ या काळात आलेल्या कलवरी, खंदेरी, करंज, करसुरा तर १९७३-७५ या काळात वेला, वगीर, वगील, वागशिर यांना नियत वयोमानानुसार निवृत्ती देण्यात आली. तीच नावं सध्या दिली जातात. एकूणच सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी बाबूंची ही कामं करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. फायली पटापट हलल्या पाहिजेत. तरच देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलर्सची होईल ना!”

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content