HomeArchive'अड्डा२४७' करणार दृष्टिबाधितांसाठी...

‘अड्डा२४७’ करणार दृष्टिबाधितांसाठी शैक्षणिक सामग्री!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याच्या आपल्या उद्द्येशाला अनुसरून प्रगती करणारा ऑनलाईन लर्निंग मंच `अड्डा२४७’ने इंडिक-एआयच्या सहयोगाने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामग्री निर्माण करण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. अड्डा२४७, तंत्रज्ञान सक्षम फाउंडेशन इंडिक-एआयला शैक्षणिक सामग्री प्रदान करेल, ज्यावर पुढे जाऊन एआय आणि डीप लर्निंगसह पाहण्यासाठी असक्षम विद्यार्थ्यांकरिता योग्य सामग्री बनविण्यासाठी प्रक्रिया करण्यात येईल.”
 
या सहयोगाचा मुख्य उद्द्येश दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक सामग्री सोप्या रीतीने हाताळण्यासह समजण्यायोग्य बनविण्याचा आहे. यावर्षी दोन्ही एडुटेक भागीदार ४०%पेक्षा जास्त दृष्टी असलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी सामग्री तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतील. तसेच पुढील वर्षी ऐकण्यास आणि बोलण्यास असक्षम असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण सामग्री उपलब्ध करून देण्याचा दोघांचा प्रयत्न असेल. दृष्टिबाधित विद्यार्थी त्यांच्या लॅपटॉप / मोबाइल फोनवरील एम्बेड स्क्रीनरीडरद्वारे सहजपणे या सामग्रीचा वापर करू शकतील.
 
“`अड्डा२४७’चे संस्थापक अनिल नांगर यांनी सांगितले की, आम्ही देशभरातील लाखो दिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सामग्रीचा वापर करण्याकरिता तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत त्याच्या गरजेनुसार आमची मदत पोहोचविण्याची कर्तव्यपूर्ती करीत आहोत.”
 

Continue reading

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...
Skip to content