Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्री कधी अयोध्येत,...

मुख्यमंत्री कधी अयोध्येत, कधी पांडुरंगापुढे, भक्तांचे मात्र वावडे!

मदिरेच्या सापडलेल्या बाटल्या मंत्रालयात टनावर गोळा होतात. हृदयसम्राटांनी आणि प्रबोधनकारांनी अंधश्रद्धेवर आघात करून मराठी मुलखाला श्रद्धेचा देव सांगितला होता. आज राज्याचे मुख्यमंत्री आयोध्येला जातात. पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि भक्तांना मात्र सरकारी आदेशाने देवाच्या दर्शनाला बंदी घालतात. हा अन्याय, ही मुस्कटदाबी पांडुरंगाचे वारकरी आणि रामाचे भक्त कदापी सहन करणार नाही, असा इशारा राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आज दिला.

सरकारने पाच महिने मंदिरे बंद ठेवून हिंदूंच्या भावना दुखावणारा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने गेली पाच महिने सरकारी आदेशाने मंदिरे बंद ठेवली आहेत. मंदिरे बंद ठेवून मदिरा खुली करण्याचे महसुली कारस्थान आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे बुद्ध विहार असो अगर पांडुरंगाचे मंदिर असो, अशी श्रद्धास्थाने बंद असल्यामुळे सामान्य भक्ताच्या उपजीविकेची साधनेच या सरकारने बंदिस्त करून ठेवली आहेत. त्यामुळे श्रद्धाळू गरीब लोकांची उपासमार होत आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकार अशा गरीब लोकांना काहीतरी मदत करेल असे वाटले होते. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरू झाली आहेत. येथे मोर्चा, बैठका, लग्नसोहळे, बारशाचे कार्यक्रम मात्र धुमधड्यात, दिमाखात चालू असून देवधर्मावर सातत्याने अन्याय करणारे देवीदेवतांना बंदिस्त करून श्रद्धाळू भक्तांची उपासमार करत आहे. आघाडी सरकारने तत्काळ मंदिरे उघडावीत. तुळजापूर, गांणगापूर, सिद्धेश्‍वर, रूपाभवानी ही भक्तांची श्रद्धास्थाने वारकऱ्यांचा पांडुरंग तत्काळ देवदेवतांचा दरवाजा उघडावा. श्रावणाच्या पवित्र मुहुर्तावर भाजपाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे आज शंखनादाच्या राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केलेले आवाहन योग्य असून आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने पाठींबा दिला आहे. परिसरातील प्रमुख मंदिरे, धार्मिक स्थळांसमोर टाळ, घंटा व शंख वाजवून नारा देत आंदोलन करावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलेच आहे. त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही ढोबळे यांनी केले आहे.

कंस मामाचा कर्दनकाळ अर्थात कृष्ण जन्माच्या भीतीने कंस मामाने वसुदेव देवकीला बंदिस्त केले होते. परंतु विधीलिखीत घडणारा प्रसंग राज्यालाही टाळता आला नव्हता. आज केवळ गोळा होणाऱ्या महसुलाच्या मोहापोटी सरकार मंदिरे बंद ठेवून दारूची दुकानं उघडी ठेवतंय. कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसने राष्ट्रीय पक्ष कुंटुंबातच मर्यादित केल्यामुळे कुंटुंबालाच कार्यकारणी समजून राष्ट्रीय पक्षाच्या मालकीचा सातबारा केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content