Homeचिट चॅटभरत सावंतने जिंकली...

भरत सावंतने जिंकली नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकलाताई फौंडेशन व अविनाश नलावडे स्पोर्ट्सतर्फे बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली‌ कॅरमप्रेमी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धा आरपीडी हायस्कूल-सावंतवाडीच्या भरत सावंतने जिंकली. निर्णायक बोर्डाच्या अगोदर ११-७ अशी आघाडी घेणाऱ्या द्वितीय मानांकित प्रसन्न गोळेला भरत सावंतने ११-१० असे चकविले. अंतिम फेरीपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना लीलया पराभूत करून दर्जेदार खेळ करणाऱ्या पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिल्या १६ विजेत्यांना-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्काराने अविनाश नलावडे, विजय नलावडे, फौंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर लोहे, प्रमुख पंच संतोष जाधव, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

कांदिवली येथे झालेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील ६८ शालेय खेळाडूंच्या सहभागाने सिनको चँम्पियन कॅरम बोर्डवर रंगलेल्या स्पर्धेमधील उपांत्य फेरीत भरत सावंतने प्रथम मानांकित केवल कुळकर्णीचा तर प्रसन्न गोळेने राजापूरच्या निधी सप्रेचा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली होती. स्पर्धेमध्ये उपांत्य उपविजेतेपद एसकेकेंई स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी व विश्वनाथ विद्यालय-राजापूरची निधी सप्रे यांनी तर उपांत्यपूर्व उपविजेतेपद संकल्प व्हॅली स्कूल-पुणेचा हर्षित शिंदे, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा शिवांश मोरे, डॉन बॉस्को हायस्कूल-कणकवलीची दिव्या राणे, होली फॅमिली हायस्कूल-अंधेरीचा चैतन्य पोमेंडकर यांनी पटकाविले. दिव्यांश सिंग, आदित्य चौहान, वेदांश प्रजापती, हर्ष नागदा, देवांश बेलोसे, अनय म्हेत्रे, गौरी सावंत, विहा राणे आदींनी उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविला.

मुंबई महापालिकेच्या इच्छुक शाळांनी मोफत कॅरम मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीला संपर्क साधावा, असे आवाहन अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण व सल्लागार अविनाश नलावडे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

१९७७ ते २००८… ३१ वर्षांच्या आठवणी तराळल्या एकाच छताखाली!

दिवाळी म्हटली की दिव्यांची आरास आणि फराळाचा सुगंध, पण यंदाची दिवाळी वसंत सहकारी साखर कारखाना, वनकोठे - वसाकाच्या (जळगाव जिल्हा, एरंडोल तालुका) परिवारासाठी वेगळीच ठरली. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सन १९७७ ते २००८ या कालावधीतील जवळपास १५० मित्र...

मुंबईत येत्या २० नोव्हेंबरपासून ३ दिवस रसिकांसाठी संगीताची मेजवानी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, सुरांची माधुरी आणि स्वरकलेचा अभिजात वारसा जपणाऱ्या मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने यंदाही वार्षिक संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ नोव्हेंबर, या कालावधीत रंगणारा हा त्रिदिवसीय संगीत महोत्सव...

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प होणार व्हेटो अध्यक्ष?

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सपाटून मार खाल्ल्यानंतर ट्रम्प यांचे अध्यक्षपद फक्त नामधारी राहणार आहे. येत्या तीन जानेवारीपर्यंत ट्रम्प यांची सध्याची ध्येयधोरणे अस्तित्त्वात राहतील. मात्र, त्यानंतर त्यांना अमेरिकी काँग्रेस (प्रतिनिधीगृह) तसेच सिनेटमधल्या डेमॉक्रॅटिक...
Skip to content