Tuesday, December 24, 2024
Homeडेली पल्सचला चाळवूया क्रांतीवीर...

चला चाळवूया क्रांतीवीर मदनलाल धिंग्रांच्या स्मृती!

भारतीय क्रांतिकारकांचा इतिहास पाहिला तर, पंजाबमधील आद्य क्रांतीकार म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मदनलाल धिंग्रा यांचा आज म्हणजेच 17 ऑगस्ट हा बलीदानदिनत्यांच्याविषयी थोडेसे.

मदनलाल धिंग्रा यांचा जन्म 18 फेब्रुवारी, 1883 साली पंजाबमधील एका क्षत्रिय घराण्यात झाला. सन 1906मध्ये ते आगबोटीवर काम करुन स्वकष्टाने इंग्लंडला गेले. सन 1908पासून स्वातंत्र्यवीर सावरकर, शामाजी कृष्णवर्मा इ.च्या सहवासात आल्यावर त्यांच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित होऊन मदनलाल यांच्यातील क्षात्रतेज व देशप्रेम जागृत झाले. त्यांनी कर्झन वायली या दुष्ट जुलमी व भारतद्वेषी अधिकार्‍याला संपविण्याचा निश्चय केला.

लंडन येथील नॅशनल इंडियन असोसिएशनच्या सभेला व समारंभाला कर्झन येणार आहेत, ही खात्रीलायक बातमी मदनलाल यांना समजली होती. समारंभात मदनलाल यांनी चार गोळया झाडल्या. कर्झन हे तत्काळ जागेवर ठार झाले. मदनलाल यांना तेथेच पकडण्यात आले. लंडन येथील पेन्टेनव्हिली या करागृहात 17 ऑगस्ट 1909 रोजी सकाळी 9 वाजता या क्रांतिवीराला फाशी देण्यात आली.

मदनलाल यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते व ते तितक्याच स्पष्टपणे व्यक्त करीत असत की, परकीय शस्त्रात्रांच्या सहाय्याने दास्यात जखडून पडलेले राष्ट्र हे निरंतरच युध्दमान राष्ट्र होय. उघडपणे रणांगणात उतरुन सामना देणे अशक्य असल्यामुळे मी दबा धरुन हल्ला चढविला. बंदुका तोफा वापरायची मला परवानगी नाही म्हणून मी पिस्तूल वापरले. भारतीयांजवळ मातृभूमीसाठी देता येईल, तर ते स्वत:चे रक्तच होय.

मदनलाल हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहात होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळया टेबलवर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्यावेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलाल यांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की, ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी.

मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट. मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी देशभक्तांनी अनेक मार्ग शोधले. इंग्रजांना जरब बसावी यासाठी देशभक्तांनी क्रांतीकारक मार्गाने लढा दिला. राष्ट्ररक्षण व ब्रिटिशांपासून सुटका यासाठी अनेक क्रांतीकारक संघटना उदयास आल्या. मदनलाल धिंग्रा हे अभिनव भारत या क्रांतीकारक संघटनेचे सदस्य बनले. सन 1909मध्ये या जहाल क्रांतीकारकाने लंडनमध्ये एका माजी इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला. धिंग्रा यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या क्रांतीकारकाच्या रक्तातून महान स्वातंत्र्याची बिजे रूजली हे जास्त महत्त्वाचे आहे.

17 ऑगस्ट 1909ला मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. त्यांचा मृतदेहसुद्धा अग्नीसंस्कारासाठी मित्रांना न देता पेंटनव्हील कारागृहातच पुरण्यात आला. आई-वडील, पत्नी व मुलगा यांना हिंदुस्थानातच सोडून आलेल्या धिंग्रांचे यावेळी वय होते फक्त 25 वर्षे! राजधानीत एका उच्चपदस्थ इंग्रजाला कंठस्नान घालणार्‍या या महान क्रांतीकारकाला शतशः प्रणाम!

Continue reading

तथाकथित पर्यावरणवाद्यांचा नाद सोडा, शाडूच्या गणेशमूर्तीच आणा!

चिकणमाती किंवा शाडूची माती यापासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची...

चला.. सुराज्य स्थापनेचा संकल्प करूया!

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी असीम त्याग करून आणि आपल्या प्राणांचे बलिदान देऊन इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला सोडवले, यामुळेच आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू शकत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आपल्याला स्वराज्य मिळाले. मात्र, सुराज्य...

स्वतःला झोकून देणारा क्रांतीकारक- खुदीराम बोस!

खुदीराम बोस! भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर. हिंदुस्थानवर जुलमी सत्ता गाजवणार्‍या ब्रिटीश साम्राज्यावर ज्यांनी अलौकिक धैर्याने पहिला बॉम्ब फेकला, शालेय जीवनातच वन्दे मातरम् या पवित्र मंत्राने भारावून ज्यांनी भारतभूच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले त्या खुदीराम...
Skip to content