Homeपब्लिक फिगरबारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक ‘बिनविरोध’ करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. पक्षश्रेष्ठींकडून या दोन्ही मतदारसंघांसाठी हिरवा कंदील मिळाल्याने महाविकास आघाडीतील (एमव्हीए) अंतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी बारामतीतून निवडला जाणारा अजितदादांचा उत्तराधिकारी बिनविरोध असण्याची शक्यता कमी आहे.

भाजपचे आवाहन आणि मविआतील मतभेद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत ही निवडणूक ‘भावनिक’ आणि ‘बिनविरोध’ व्हावी, अशी भूमिका मांडली होती. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, “जर मित्रपक्ष लढणार नसतील, तर आम्ही आमचा उमेदवार रिंगणात उतरवू,” असे म्हणत काँग्रेसने आपला दावा ठाम केला आहे. राहुरीमध्येही बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विजयाचा विश्वास व्यक्त केल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

२३ एप्रिलला मतदान; राज्याचे लक्ष निकालाकडे

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांत येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामतीमध्ये लक्ष्मण हाके यांच्यासारख्या अपक्ष उमेदवारांनीही शड्डू ठोकल्याने ‘बिनविरोध’च्या आशा मावळल्या आहेत. काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीत जागावाटपावरून नव्याने पेच निर्माण झाला असून, ही पोटनिवडणूक आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरणार असल्याची चर्चा राजकीय तज्ज्ञांमध्ये सुरू आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content