Homeचिट चॅट‘गोवा काजू फेणी’ला...

‘गोवा काजू फेणी’ला आले ‘अच्छे दिन’!

दारूचा आनंद लुटणाऱ्या मद्यपींना गोवा काजू फेणीची लज्जत काय असते हे नव्याने सांगायला नको. त्यामुळेच गोव्यातून महाराष्ट्रात येणारे कित्येक जण गोवा काजू फेणीची तस्करी करतात. दारूच्या थेंबालाही न शिवणारेही असंख्य लोक यात कळतनकळत सहभागी होतात.

गोव्याच्या याच काजू फेणीला सध्या जरा जास्त महत्त्व आले आहे. कालच गोवा टपाल विभागाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 दरम्यान गोवापेक्स 2021 या जिल्हास्तरीय आभासी फिलाटेली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनातील पहिल्या टप्प्यात काल गोवा काजू फेणीवर विशेष कव्हर आणि कॅन्सलेशनचे प्रकाशन झाले. पोस्ट मास्तर जनरल कर्नल एस एफ एच रिझवी यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. पणजी मुख्यालयात हे कव्हर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

अमृत महोत्सव आणि गोवा मुक्ती हीरक महोत्सवी वर्ष यानिमित्ताने आगामी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात फिलाटेलीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि गोव्यातील वारसास्थळे आणि संस्कृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

फेणी तयार करण्याच्या प्रक्रियेवर हे कव्हर आधारीत आहे. या विशेष कॅन्सलेशन प्रकाशनाप्रसंगी वरिष्ट टपाल अधीक्षक डॉ. सुधीर जाखेरे, गोवा फिलाटेली आणि न्यूमीस्मॅटीक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार यांची उपस्थिती होती.

Continue reading

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...
Skip to content