Homeडेली पल्सनिलगिरी श्रेणीतले ‘तारागिरी’...

निलगिरी श्रेणीतले ‘तारागिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात

माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडद्वारे बांधलेले निलगिरी श्रेणीतले (प्रकल्प 17अ)मधले चौथे जहाज ‘तारागिरी’ मुंबईत माझगाव डॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय नौदलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आले. युद्धनौकेच्या डिझाइन आणि बांधकामातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने झालेले हे आणखी एक मोठे पाऊल आहे. प्रकल्प 17अ फ्रिगेट्स ही बहुमुखी मोहिमांसाठी तयार केलेली जहाजे असून सागरी क्षेत्रातल्या सध्याच्या आणि भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे.

तारागिरी, हे पूर्वीच्या आयएनएस तारागिरीचे नवे रूप आहे. ते एक लिएंडर-क्लास फ्रिगेट होते जे 16 मे 1980 ते 27 जून 2013 या कार्यकाळात भारतीय नौदलाच्या ताफ्याचा भाग होते. तब्बल 33 वर्षे त्याने देशासाठी गौरवशाली सेवा दिली. नव्या पिढीचे हे अत्याधुनिक जहाज नौदल डिझाइन, स्टेल्थ, अग्निशक्ती, स्वयंचलन आणि टिकाऊपणाच्या क्षमतेतील एक मोठी झेप मानली जाते. वॉरशिप डिझाइन ब्युरो यांनी याचे डिझाइन केले असून युद्धनौकेची देखरेख मुंबईच्या टीमने केली आहे. एकात्मिक बांधकामाच्या तत्त्वज्ञानावर आधारित, हे जहाज निर्धारित वेळेत बांधून नौदलाकडे सुपूर्द केले गेले आहे.

P17A जहाजे P17 (शिवालिक) वर्गाच्या तुलनेत प्रगत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर प्रणालीने सुसज्ज आहेत. या जहाजांमध्ये कम्बाइंड डिझेल किंवा गॅस (CODOG) प्रोपल्शन प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीत डिझेल इंजिन आणि प्रत्येक शाफ्टवर कंट्रोलेबल पिच प्रोपेलर (CPP) चालवणारे गॅस टर्बाइन आणि अत्याधुनिक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (IPMS) यांचा समावेश आहे. शक्तिशाली शस्त्रास्त्र आणि सेन्सर्स संचामध्ये ब्रह्मोस SSM, MFSTAR आणि MRSAM प्रणाली, 76मीमी SRGM, 30मीमी आणि 12.7मीमी क्लोज-इन वेपन सिस्टीमचा समावेश आहे. याशिवाय पाणबुडीविरोधी युद्धासाठी रॉकेटस् आणि टॉर्पेडोदेखील जहाजावर बसवण्यात आले आहेत.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content