Homeकल्चर +विनय आपटेंच्या स्मृतिदिनानिमित्त...

विनय आपटेंच्या स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धा

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे ह्यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि मुंबईतल्या विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लघु चित्र (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबरपर्यन्त आहे. यावर्षी ह्या शॉर्ट फिल्म्सना विषयाचे बंधन नाही. कुठल्याही विषयावर शॉर्ट फिल्म्स पाठवता येतील. मात्र ती जास्तीतजास्त 20 मिनिटांची असावी. त्यासाठी 25 वर्षांखालील आणि 25 वर्षांवरील असे दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत.  तसेच ह्या शॉर्ट फिल्म्स मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत पाठवता येतील.

प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. दोन्ही गटातील सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका vinayaptepratishthan@gmail.com या संकेतस्थळावर दि. २५ नोव्हेंबर २०२५पर्यन्त पाठवायच्या आहेत. प्रवेशमूल्य रु. 500 आहे. स्पर्धेतील दोन्ही गटात प्रत्येकी प्रथम क्रमांकाच्या शॉर्ट फिल्मला रु. 15,000/- द्वितीय क्रमांकाला 10,000/- आणि तृतीय क्रमांकाला रु. 7,500/- अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. ह्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरुसोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संकलक राजन वाघधरे, जाहिराततज्ज्ञ भरत दाभोळकर, ज्येष्ठ चित्रपट संकलक भक्ती मायाळू आणि सुप्रसिद्ध लेखिका  आणि गीतकार रोहिणी निनावे हे आहेत.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...
Skip to content