Homeएनसर्कलभारतीय तटरक्षक दलात...

भारतीय तटरक्षक दलात ‘अक्षर’ तैनात

भारतीय तटरक्षक दलाची अक्षर, ही अदम्य श्रेणीच्या मालिकेतील दुसरी गस्ती नौका काल पुद्दुचेरीत कराईकल येथे तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. गोवा शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी पद्धतीने तयार केलेली ही नौका 51 मीटर लांब आहे. 60%पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असलेली आयसीजीएस ‘अक्षर’, ही केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारताच्या वाढत्या सागरी क्षमतेचे प्रतीक आहे.

या जहाजाचे जलविस्थापन सुमारे 320 टन आहे.  3000 किलोवॉट डिझेल इंजिनाच्या मदतीने ती 27 नॉट्स इतक्या कमाल वेगाने प्रवास करू शकते. कमीतकमी वेगाने 1500 सागरी मैल कापण्याची या नौकेची क्षमता आहे. तिच्यावर स्वदेशी बनावटीचे दोन नियंत्रणक्षम पिच प्रोपेलर्स आणि गिअरबॉक्स बसवले आहेत, ज्यामुळे समुद्रात अतिशय उत्तम पद्धतीने विहार करण्याची क्षमता आणि कार्यक्षम लवचिकता असलेली ही नौका आहे. त्याबरोबरच ती 30 मिमी सीआरएन 91 गन आणि दोन 12.7 मिमी स्टॅबिलाइज्ड रिमोटनियंत्रित गन यासारख्या एकात्मिक शस्त्रप्रणालीने सुसज्ज आहे. नौकेच्या परिचालनात्मक कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी यात इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टीम, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम आणि ऑटोमेटेड पॉवर मॅनेजमेंट सिस्टीमसारख्या स्वयंचलित प्रणालींचा समावेश आहे. ‘आयसीजीएस अक्षर’ हे जहाज कराईकल, पुदुच्चेरी येथे तैनात असेल. संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव दीप्ती मोहिल चावला यांच्या हस्ते आयसीजीएस अक्षर तैनात करण्यात आली. अक्षर, या शब्दाचा अर्थ अविनाशी असा आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content