आरक्षण प्रणालीचा लाभ सर्वप्रथम सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावा आणि गैरवापर करणाऱ्या घटकांकडून होणारा वापर टाळ्याकरीता येत्या 1 ऑक्टोबर 2025पासून, रेल्वेच्या सामान्य आरक्षणाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 मिनिटांत, आरक्षित सामान्य तिकीट फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच केले जाऊ शकेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या संकेतस्थळ/अॅपद्वारे हे तिकीट बुक केले जाऊ शकेल.

तथापि, सध्या भारतीय रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काऊंटरद्वारे सामान्य आरक्षित तिकीट बुक करण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. तसेच, अधिकृत रेल्वे तिकीट एजंट्सना सुरुवातीच्या दिवशी आरक्षित तिकीट बुक करण्याची परवानगी नसलेल्या 10 मिनिटांच्या प्रतिबंधातही कोणता बदल होणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.