Homeहेल्थ इज वेल्थमिनी थोरॅकोटॉमीद्वारे डॉक्टरांनी...

मिनी थोरॅकोटॉमीद्वारे डॉक्टरांनी वाचवले साडेतीन वर्षांच्या मुलाचे प्राण

एका दुर्मिळ व असाधारण वैद्यकीय केसमध्‍ये मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला धातूचा एलईडी बल्ब यशस्वीरित्या बाहेर काढला. या बल्बमुळे तीन महिन्‍यांपासून त्‍याला सतत खोकला आणि श्‍वसनाचा होत असलेला त्रास अखेर दूर झाला. राहुल (गोपनीयतेसाठी नाव बदलले आहे) सुरुवातीला निदान झालेल्या न्‍यूमोनिया आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे त्याच्यावर अँटीबायोटिक्सचे अनेक औषधोपचार करण्‍यात आले. मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्यानंतरदेखील, त्याची लक्षणे कायम राहिली. त्यामुळे त्‍याची प्रगत तपासणी करण्‍यात आली, ज्यामध्ये सीटी स्कॅन करण्‍यात आले. यामधून त्‍याच्‍या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा भाग असल्याचे आढळून आले. कोल्हापूरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपीच्या अयशस्वी प्रयत्‍नांनंतर मुलाला जसलोक हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले, जेथे ब्रॉन्कोस्कोपीमध्ये गिळण्‍यात आलेला एलईडी बल्‍ब ब्रोन्कसमध्ये आढळून आला. त्यानंतर डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्य प्रभात यांनी मिनी थोरॅकोटॉमी (४ सेमी कट) केली, ज्यामुळे खेळण्यांच्या गाडीतून गिळलेला एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला आणि मुलाच्या फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यात आले. अॅनेस्थेसियोलॉजी सल्लागार डॉ. अनुराग जैन यांनी या शस्त्रक्रियेला मोठे सहकार्य केले.

या केसबाबत मत व्‍यक्‍त करत जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत म्‍हणाले की, आम्‍ही ऑपरेट केलेली ही सर्वात दुर्मिळ केस होती. एलईडी बल्ब फुफ्फुसामध्‍ये खोलवर गेला होता आणि समकालीन उपचारपद्धती तो बल्‍ब बाहेर काढण्‍यामध्‍ये अयशस्‍वी ठरल्‍या. काळजीपूर्वक नियोजन केलेल्या मिनी थोरॅकोटॉमीसह आम्‍ही सुरक्षितपणे एलईडी बल्‍ब बाहेर काढला आणि मुलाला जीवनदान मिळाले.

ईएनटी सर्जन डॉ. दिव्य प्रभात म्‍हणाल्‍या की, मुलांमध्ये अस्पष्ट आणि सतत दिसणाऱ्या श्‍वसनसंबंधित लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. यामुळे अनेकदा न्यूमोनिया किंवा इतर सामान्य आजारांमुळे अशा केसचे निदान होण्यास विलंब होतो. प्रगत इमेजिंगद्वारे लवकर निदान केल्यास परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि गुंतागूंत टाळता येऊ शकते.

जागरूकतेच्‍या महत्त्वावर भर देत चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्‍हणाले की, मुलांनी एखादी वस्‍तू गिळणे हे पालकांच्‍या लक्षात न येणे स्‍वाभाविक आहे. वेळेवर वैद्यकीय लक्ष आणि स्‍पेशालिस्‍ट हस्‍तक्षेप फुफ्फुसाचे दीर्घकालीन नुकसान होण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. ही केस पालकांना व आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांना मुलांमध्‍ये गंभीर, अनिश्चित श्‍वसनसंबंधित समस्‍या आढळून आल्‍यास दक्ष राहण्‍याची आठवण करून देते.

आभार व्यक्‍त करत, मुलाचे वडील म्हणाले की, आम्हाला किती दिलासा मिळाला आहे ते शब्दात सांगता येऊ शकत नाही. तीन महिने आम्ही सतत भीतीच्‍या वातावरणात जगत होतो, आमच्या मुलाला काय झाले आहे हे आम्हाला कळत नव्हते. जसलोक हॉस्पिटलमधील टीमचे आभार, आरव आता मोकळा श्‍वास घेत आहे आणि पुन्हा हसत आहे. या हॉस्पिटलने आमच्या मुलाला नवीन जीवन दिले आहे आणि आम्ही नेहमी त्‍यांचे आभारी राहू.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content