Homeमाय व्हॉईसतुमचे श्रीराम तर...

तुमचे श्रीराम तर माझी सीतामैय्या! नितीशबाबूही लागले भजनी!!

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे भव्यदिव्य राममंदिर बांधून देशातील मतदारांचे डोळे दिपवले होते, हे सर्वजण जाणतात! आता काही दिवसांतच बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. नेमका हाच मुहूर्त साधून बिहारचे मुख्यमंत्री नितीशबाबूंनी ‘जानकी जन्मस्थल मंदिर’ प्रकल्पाची जोरदार घोषणा केली आहे. हा सीतामैया (होय हो.. जानकी म्हणजेच सीतामैया) मंदिर प्रकल्प सध्यातरी सुमारे 882.87 कोटी रुपयांचा असल्याचेही बिहार सरकारने घोषित केले असले तरी हा खरंच एक हजार कोटी रुपयांवर नक्कीच जाईल असा जाणकरांचा होरा आहे. या मंदिराचा शिलान्यास नारळी पौर्णिमेच्या दिवशी (8 ऑगस्ट) झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राजकारणासाठी कधीच मंदिर-मशिदीचा वापर केला नाही. मग आताच नितीशबाबूंना सीतामैयाच्या मंदिराची आठवण का झाली असावी, असा प्रश्न बिहारी जनतेला पडला आहे.

सीता हे शोषिक आणि शोषणाचे प्रतीक

बिहारी माणूस हा कमालीचा सहनशील असतो व त्यामुळेच त्याचे सर्वप्रकारांनी शोषणही होत असते. नितीशकुमार हे प्रथम समाजवादी असल्यानेच त्यांनी शोषणाचे प्रतीक म्हणून सीतामैयाची निवड केली असल्याचे जाणकारांचे मत आहे. मराठीतील प्रख्यात नाटककार मामा वरेरकर यांनीही आपल्या गाजलेल्या ‘भूमिकन्या सीता’ या नाटकात याच शोषिक व शोषणाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. रामायणात सीतेची प्रतिमा कमकुवत स्त्री म्हणूनच उभी करण्यात आलेली आहे, असे मत असे विद्वानांनीही व्यक्त केलेले आहे. सोज्ज्वळ रूप दाखवताना तिलाच सहनशीलतेची मूर्ती दाखवून तिची काहीच चूक नसताना तिला एका वेगळ्या अर्थाने शिक्षाच सुनावण्यात आल्या, असे डाव्या व समाजवादी विचारवंतांना वाटते. म्हणूनच असेल कदाचित नितीशबाबूंनी सीतामाईंना न्याय द्यायचे ठरवले असावे.

आता राजकीय गणित

बिहारच्या मिथिला विभागात धर्मभावनेला मोठा मानसन्मान आहे. त्यातच दरभंगा, मधुबनी, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, सीतामढी, शेहोर, वैशाली, सहारसा, सुपौल आणि मधेपुरा, असे सुमारे दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या १० जिल्ह्यांत मिळून राज्य विधानसभेच्या एकूण ६९ जागा आहेत आणि बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागापैकी याची टक्केवारी २९ टक्के इतकी आहे. म्हणजेच बिहार विधानसभा जिंकायची असेल तर या विभागातील धर्मभावनेला फुंकर घालून धार्मिक ज्योत प्रज्ज्वलीत केलीच पाहिजे, या एकमेव हेतूने नितीशबाबूंनी शोषित सीतामैयाचे बोट घट्ट धरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही नितीशबाबूंच्या पाठीशी असून या जानकी मंदिराला काही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

अखेर समजवादी विचसारसरणीलाही मंदिर राजकारणाच्या आहारी जावेच लागले, असे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील समाजवादी ‘सॉफ्ट हिंदुत्व’, ‘हार्ड हिंदुत्व’ असा शाब्दिक खेळ करतात की ‘शोषित हिंदुत्व’ असा नवीनच शोध लावतात, ते पाहवे लागेल!

छायाचित्रः प्रवीण वराडकर

(आधार- इंडिया टुडे)

Continue reading

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज...

पंकजराव, ठाणेकरांना असते शिस्तीचे कायम वावडे!

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण,...
Skip to content