Homeहेल्थ इज वेल्थआता 'एटीएम'मध्ये जाऊन...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

“हेल्थ रिपोर्ट्स” मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. “एटीएम”मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता “हेल्थ रिपोर्ट” मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात “हेल्थ एटीएम” मशीन सुरू झाली आहे. हे हेल्थ ATM हे महाराष्ट्र सरकारच्या निधीतून बसवले आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यात 45 हेल्थ एटीएम कियोस्क बसविण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेत शासकीय रुग्णालयांमध्ये हेल्थ एटीएम बसवले जात आहेत.

कुठल्या कुठल्या तपासण्या केल्या जातात?

हेल्थ एटीएम मशीन म्हणजे एक डिजिटल आरोग्य तपासणी केंद्र आहे, जिथे डॉक्टरांशिवाय त्वरित तपासण्या करता येतात. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, ऑक्सिजन, तापमान, वजन, ECG, हिमोग्लोबिन, BMI, यूरीन, आणि स्पायरोमेट्री अशा दहा वेगवेगळ्या आरोग्य तपासण्या अवघ्या दहा मिनिटांतच  करता येतात. यात IoT आणि AI वापरून लगेच रिपोर्ट मिळतो आणि गरज असल्यास डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलवर सल्ला घेता येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्वरित, दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावरही हेल्थ एटीएम उपलब्ध

नंदुरबारसह चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न जिल्हा रुग्णालयात ही हेल्थ एटीएम सेवा उपलब्ध आहे. याशिवाय, नागपूर रेल्वेस्थानकावरही हेल्थ एटीएम मशीन उपलब्ध आहे, जिथे काही मिनिटांत तपासण्या करता येतात. ही सेवा हळूहळू राज्यभरातील तालुका आणि ग्रामीण रुग्णालयांमध्येही सुरू केली जात आहे. हेल्थ एटीएमबद्दल माहिती मिळवण्यासाठी 104 हेल्पलाइनवर कॉल करता येऊ शकतो. तिथे तपासणी केंद्राचे स्थान, वेळ आणि प्रक्रिया याबद्दल सर्व माहिती मिळेल. राज्यातील काही खासगी हॉस्पिटलमध्येही हेल्थ एटीएम सेवा उपलब्ध आहे. काही ठिकाणी या डिजिटल हेल्थ किऑस्कवर BP, शुगर, BMI, SPO2, ECG, कोलेस्टेरॉल, इ.सह 60पेक्षा जास्त तपासण्या अवघ्या काही मिनिटांत करता येतात.

हेल्थ ATM वापरण्याची प्रक्रियाः

हेल्थ ATM वापरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

1. मशीनवर जा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचना फॉलो करा.

2. आधार/मोबाईल नंबर टाका किंवा बायोमेट्रिक वापरा.

3. तपासणी निवडा (BP, शुगर, ECG, इ.), मशीनवर दिलेली उपकरणे वापरून तपासणी करा.

4. काही मिनिटांत रिपोर्ट स्क्रीनवर, SMS/WhatsApp वर किंवा प्रिंटमध्ये मिळतो.

5. गरज असल्यास, व्हिडिओ कॉलवर डॉक्टरांचा सल्ला मिळवू शकता.

सध्या आपल्याकडे सरकारी हेल्थ ATM थेट वापरता येत नाही. त्यासाठी नमूद आरोग्य प्रतिनिधी मदत करतो.

हेल्थ

सध्या कार्यरत, प्रस्तावित असलेली हेल्थ एटीएम:

महाराष्ट्र राज्य सरकारने 25 कोटींचा निधी मंजूर करून 45 हेल्थ ATM बसवण्याची योजना जाहीर केली आहे. हेल्थ ATM एका युनिटसाठी साधारण 6.5 लाख ते 7 लाख रुपये इतका खर्च येतो. राज्यात सध्या कार्यरत, प्रस्तावित असलेली हेल्थ एटीएम ठिकाणे-

1. नंदुरबार (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)

2. चंद्रपूर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)

3. कामा हॉस्पिटल, मुंबई

4. नागपूर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)

5. कोल्हापूर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)

6. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

7. पुणे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)

8. बारामती (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)

या यादीतील काही प्रस्तावित आणि काही ठिकाणी मशीन कार्यरत आहे; उर्वरित ठिकाणांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे.

1 COMMENT

  1. वाह वाह! अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. अभिनंदन! लौकरच मुंबईत सगळ्या रुग्णालयात ही सेवा सुरु होईल अशी आशा व्यक्त करते. चांगली माहिती.

Comments are closed.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content