Homeचिट चॅटविसडम चेस स्पर्धेत...

विसडम चेस स्पर्धेत अधवान, कथितचे नॉनस्टॉप जेतेपद

शाळेची सुट्टी संपण्यापूर्वी शालेय बुद्धिबळपटूंसाठी विसडम चेस अॅकॅडमीने आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. ७ वर्षांखालील गटात अधवान ओसवाल आणि ८ वर्षांखालील गटात कथित शेलारने नॉनस्टॉप सहा विजय नोंदवत अव्वल सहा गुणांसह बाजी मारली तसेच विविध सहा गटांत निधिष खोपकर, गिरिषा पै, एडन लसराडो, आर्यन पांडे, विराज राणे आणि रुद्र कांडपाल यांनी पहिले स्थान पटकावत यश संपादले.

शालेच बुद्धिबळपटूंना आपल्याच वयोगटातील मुलांविरुद्ध बुद्धिकौशल्य दाखवता यावे म्हणून फिडे आर्बिटर आणि आयोजक अक्षय सावंतने मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत तब्बल ४००पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग लाभला आणि त्यापैकी १२० खेळाडूंना रोख पुरस्कार आणि आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. एकंदर ८ वयोगटात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अव्वल स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. अपवाद अधवान ओसवाल आणि कथित शेलार या बालबुद्धिबळपटूंचा. त्यांनी आपल्या गटात सर्वच प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत गटविजेतेपद पटकावले. उर्वरित सहा गटांत एकाही खेळाडूला सलग सहा विजय नोंदविता आले नाहीत.

६ वर्षांखालील गटात निधिष खोपकर ४.५ गुणांसह पहिला आला तर ९ वर्षांखालील गटात राज्य अजिंक्यपद मिळवणारी गिरिषा पै अव्वल ठरली. ती आणि डायटीन लोबो यांनी प्रत्येकी ५.५ गुण मिळवले होते आणि दोघांचे गुण समान असल्यामुळे सरस गुणांच्या आधारे गिरिषाला प्रथम क्रमांक देण्यात आला. ११ वर्षांखालील गटातही आर्यन पांडे आणि अश्वी अगरवाल यांच्यात समान गुणसंख्येनंतर आर्यन पहिला आला. १३ वर्षांखालील गटातही विराज राणे आणि आदित्य कदम यांच्यात अव्वल स्थान सरस गुणांच्या आधारे ठरले. या स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे ४, ३, २, १.५ आणि १ हजारांचे रोख इनाम देण्यात आले. तसेच प्रत्येक गटातून एका सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या मुलीला रोख २१०० रुपयांचे इनाम देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचा पुरस्कार सोहळा वालिया महाविद्यालयाचे विश्वस्त भारत वालिया यांच्या हस्ते पार पडला.

मुंबई मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल-

६ वर्षांखालील: १. निधीष खोपकर २. कियांश गुप्ता ३. कृतिन सिंग, ४. रियान मुणगेकर, ५. अवीर शाह, सर्वोत्तम मुलगी: कायरा अगरवाल.

७ वर्षांखालील: १. अधवान ओसवाल २. आरव देशमुख, ३. राजवीर घुमान, ४. अवीर शाह, ५. नीव चौहान, सर्वोत्तम मुलगी: इमिली दास.

८ वर्षांखालील: १. कथित शेलार, २. डायटीन लोबो, ३. जियांश शाह, ४. आरव देशमुख, ५. अगस्त्य पटवा, सर्वोत्तम मुलगी: इमिली दास.

९ वर्षांखालील: १. गिरिषा पै, २. डायटीन लोबो, ३. रियांश बोराडे ४. कथित शेलार, ५. आरव धामापुरकर, सर्वोत्तम मुलगी: ओमिशा आनंद.

१० वर्षांखालील: १. एडन लासराडो, २. गिरिषा पै, ३.लक्ष परमार, ४. देवांश डेकटे, ५. रियांश बोराटे, सर्वोत्तम मुलगी: अश्वी अगरवाल.

११ वर्षांखालील: १. आर्यन पांडे, २. अश्वी अगरवाल, ३.देवांश डेकटे, ४. गौरव बोरसे, ५. धैर्य बिजलवान, सर्वोत्तम मुलगी: आस्था पाणीग्रही.

१३ वर्षांखालील: १. विराज राणे, २. आदित्य कदम, ३. यश टंडन, ४. आरुष नाडर, ५.अगस्त्य खानका, सर्वोत्तम मुलगी: आध्या वर्दे.

१५ वर्षांखालील: १. रुद्र कांडपाल, २. हृदय मणियार, ३.शौर्य खाडिलकर, ४. विराज राणे ५.शिवांक झा, सर्वोत्तम मुलगी: मान्य बालानी.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content