Homeकल्चर +'सजना'चे 'आभाळ रातीला..'...

‘सजना’चे ‘आभाळ रातीला..’ प्रेक्षकांसमोर!

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटातील “आभाळ रातीला” या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला. प्रेम, नातेसंबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट “सजना” या चित्रपटातील नवीन गाणं “आभाळ रातीला” प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम ही भावना केवळ शब्दांतून नाही तर सूरांतूनही अनुभवता येते. ‘आभाळ रातीला ’ हे गाणं त्या प्रेमभावनेचा एक सुंदर अनुभव आहे. मराठी संस्कृतीच्या ठेव्याला उजाळा देणारा आणि परंपरेचा अभिमान जागवणारा हे गाणं आहे. या गाण्यात ढोल-ताशाचा गगनभेदी नाद, लेझीमच्या तालावर अस्सल मराठी पोशाखामध्ये नाचणारी तरुणाई आणि मुख्य अभिनेते आणि देवीच्या मंगलमय स्तुतीचा संगम रसिकांना अनुभवता येतो.

गाण्याच्या चित्रिकरणातदेखील मोठ्या मिरवणुका, ढोल-ताशाचे पथक आणि सजीव लेझीम नृत्य यांचा भव्य प्रदर्शन करण्यात आलं आहे. हे गाणे केवळ मनोरंजन नसून मराठी संस्कृतीच्या गाढ प्रेमाचा आणि परंपरेच्या जपणुकीचा एक सुंदर सोहळा आहे ज्याच्या प्रत्येक ठोक्यातून मराठी अस्मिता झळकते. सुहास मुंडे यांच्या शब्दरचनेमुळे गाण्यात प्रेमभावना अधिक खुलून आल्या आहेत. गाण्याचे चित्रिकरणसुद्धा अतिशय नयनरम्य आहे. ह्या गाण्याचे संगीतकार ओंकारस्वरूप हे आहेत तर गायक आदर्श शिंदे आणि राजेश्वरी पवार हे आहेत.

या गाण्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. शशिकांत धोत्रेंचा हा पहिलाच रोमँटिक सिनेमा आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा त्यांचेच आहे. हा सिनेमा येत्या २३ मेपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content