Skip to content
Thursday, May 15, 2025
Homeहेल्थ इज वेल्थमुंबई महापालिका दवाखान्यांत...

मुंबई महापालिका दवाखान्यांत उद्यापासून डिजिटल आरोग्यसेवा

महाराष्ट्रदिनाचे औचित्‍य साधून मुंबईकरांना आधुनिक पद्धतीने आरोग्‍यसुविधा पुरविण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका उद्यापासून सर्व दवाखान्यांमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस – २) ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करणार आहे. सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये आधुनिकता, कार्यक्षमतेची वृद्धी आणि सेवा वितरणामध्ये गती साधण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्‍त ठरणार आहे.

एचएमआयएस – २ प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व दवाखान्यांना आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा व संबधित यंत्रासमुग्री देण्यात आली आहे तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. याअगोदर रुग्णांच्या नोंदी कागदावर (पेपर) केल्या जात होत्या. मागील सहा महिने एचएमआयएस – २ प्रणाली प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आली. उद्या, २ मेपासून ही प्रणाली १७७ दवाखान्यांत कार्यान्वित केली जात आहे. तसेच, २१७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्‍येदेखील ३० मेपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.

एचएमआयएस – २ प्रणाली ही आयुष्मान भारत डिजीटल मिशनला अनुरूप आहे. यामध्ये रुग्णाला एक विशिष्‍ट ओळखपत्र क्रमांक (आयडी) दिला जाईल. या ओळखपत्राच्‍या आधारे रुग्णांना दवाखान्यातून रुग्णालयात तसेच रुग्णालयातून दवाखान्यात संदर्भित केले जाऊ शकते. त्यांच्या उपचारपद्धतीचा आढावा (ट्रॅक) घेतला जाऊ शकतो. यामुळे रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या उपचारांच्या सर्व नोंदी एकाच ठिकाणी मिळू शकतील. एचएमआयएस – २ प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी आणि औषधवितरण इत्यादी नोंदी डिजीटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. तसेच औषधसाठा व्यवस्थापन, रुग्णसेवा अहवाल, सांख्यिकीय विश्लेषण आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेसाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. पुढील टप्प्यात एचएमआयएस – २ ही प्रणाली प्रसुतीगृहे, उपनगरीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांच्यातदेखील राबविण्यात येणार आहे.

Continue reading

शाहरूख खान लंडनमधल्या ‘कम फॉल इन लव्ह..’च्या मंचावर

प्रसिद्ध सिनेअभिनेते शाहरुख खान याने लंडनमधील ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ या नाटकाच्या सरावाच्या ठिकाणी अचानक भेट दिली. १९९५मध्ये आलेल्या आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेल्या हिंदी चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’वर (डीडीएलजे) आधारित या...

आशियाई पॉवरलिफ्टिंगमध्ये गायत्री बडेकरची सुवर्णमय कामगिरी

उत्तराखंडच्या डेहराडून येथे नुकत्याच झालेल्या आशियाई सबज्युनिअर, ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सब ज्युनिअर महिलांच्या गटात आय .एन.डी. वेटलिफ्टिंग - पॉवरलिफ्टिंग क्लब, कर्जतची खेळाडू गायत्री आशा महेश बडेकर हिने ४३ किलो वजनी गटात शानदार सुवर्णमय कामगिरी केली. स्कॉट, बेंच प्रेस...

जावेद अख्तर, अनुपम खेर यांनी अनुभवला प्रदीप चंद्रांच्या छायाचित्रणाचा प्रवास!

ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप चंद्रा, ज्यांचा पन्नासहून अधिक वर्षांचा गौरवशाली कारकिर्दीचा प्रवास आहे, यांचे खास छायाचित्र प्रदर्शन ‘बॉम्बे थ्रू द आईज ऑफ प्रदीप चंद्रा’ मुंबईतल्या जुहूमधील फ्लोअर वन येथे सध्या सुरू आहे. या प्रदर्शनात चित्रपट, संगीत, कला, साहित्य, व्यवसाय आणि...