Homeचिट चॅटअडसूळ ट्रस्ट कॅरम...

अडसूळ ट्रस्ट कॅरम सराव शिबिरात नील, सारा, देविका सर्वोत्तम

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र-कामगार दिनानिमित्त १ मेपासून ४ दिवस होणाऱ्या विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या सांघिक सुपर लीग कॅरम स्पर्धापूर्व तयारीच्या सराव मार्गदर्शन शिबिरात उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू नील म्हात्रे, सारा देवन, देविका जोशी यांनी सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार पटकाविला. ज्येष्ठ कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर, संतोष जाधव, अविनाश महाडिक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी या शालेय खेळाडूंना मार्गदर्शन केले.

सुमती सेवा मंडळाचे क्रीडाप्रमुख प्रमोद पार्टे, क्रीडाशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, संदीप दळवी  यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु झालेल्या मोफत मार्गदर्शन व सराव शिबिरातील स्पर्धात्मक निर्णायक फेरीमध्ये नील म्हात्रेने सारा देवनला ८-४ असे चकविले. यावेळी आनंदराव प्लॅटीनियम, गोविंदराव फायटर्स, कॅप्टन अभिजित, आत्माराम मोरे प्रतिष्ठान, एमडीसी ज्वेलर्स, सिबिईयु वॉरीयर्स, सुमती क्वीन, फेअर प्ले, अविनाश नलावडे स्पोर्ट्स, दिलीप स्ट्रायकर्स, राणे ऑप्टीशीयंस, सुरेश फिनिशर्स आदी संघातील विविध जिल्ह्यामधील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ३६ खेळाडू जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा १ ते ४ मे दरम्यान दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात १२ संघांमध्ये साखळी सामन्यांद्वारे रंगणार आहेत. पूर्णपणे विनाशुल्क असलेल्या कॅरम उपक्रमात शालेय खेळाडूंना टी शर्ट, स्ट्रायकर, पुरस्कार दिले जाणार असून तज्ञांचे मार्गदर्शनदेखील मोफत लाभणार आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content