Homeएनसर्कलमध्य भारताला पावसाने...

मध्य भारताला पावसाने झोडपले, बिहारमध्ये दोन दिवसांत ८२ बळी!

भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मुसळधार पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही जीवितहानी झाली आहे. बिहार सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे.

गेले दोन दिवस बिहारच्या नालंदा आणि आसपासच्या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. नालंदा जिल्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मतदारसंघ आहे. बुधवारी झाडे तसेच विजा कोसळून बिहारमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. काल अशाच घटनांमध्ये ६१ जणांचा बळी गेल्याचे बोलले जाते. येत्या तीन दिवसांत तेथील हवामानात काडीचाही बदल होण्याची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहवे, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, उत्तराखंडमध्येही काल तुफान वृष्टी झाल्यामुळे चमोली परिसरातील पाण्याचे लोट आणि त्याबरोबर वाहून जाणारा गाळ नंदप्रयाग बाजारापर्यंत पोहोचला. आज सकाळी तेथे मदतकार्य करताना रस्त्यावरील चिखल दूर करून ते मोकळे केले जात होते.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content