Homeकल्चर +'मुंबई लोकल' येत...

‘मुंबई लोकल’ येत आहे ११ जुलैला!

अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला “मुंबई लोकल” हा चित्रपट येत्या ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा प्रथमच पाहता येणार आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेन्मेंट प्रस्तुत “मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेन्मेंटचे प्राची राऊत, सचिन अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. असोसिएट प्रोड्युसर त्र्यंबक डागा, सहदिग्दर्शक विनोद शिंदे असून कलादिग्दर्शक सुमित पाटील आहेत. ऍक्शन सुनील रॉड्रिग्ज, निलेश गुंडाळे, कार्यकारी निर्माता हर्षवर्धन वावरे, देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

“मुंबई लोकल” या चित्रपटात मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबने आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले आहे. ज्ञानदाच्या ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय ‘धुरळा’सारखे काही चित्रपटही तिनं केले आहेत. मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक हलकीफुलकी, तरल प्रेमकथा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content