Saturday, April 19, 2025
Homeडेली पल्सआता कॅनडातून भारतातले...

आता कॅनडातून भारतातले बिल पेमेंट करणे झाले सोपे!

कॅनडामध्ये स्थलांतरीत भरतीयांना नव्याने आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी बेकॉनने एक अफलातून सुविधा सुरु केली आहे. यामुळे बेकॉन मनी खात्यातून कॅनडीयन डॉलर्समध्ये थेट भारतातील पेमेंट करता येईल. बेकॉन सुपर एपमध्ये इंडिया बिल पे हे नवे फीचर देण्यात आले आहे. हा खास करून कॅनडातील स्थलांतरीतांसाठी डिझाइन केलेला प्लॅटफॉर्म आहे. आता गुगल आणि आयओएसवर डाऊनलोडसाठी हे एप उपलब्ध आहे. बेकॉन इंडिया बिल पे ही पहिलीच अशी सुविधा आहे, जे भारत कनेक्ट आणि भारतातील येस बँकच्या सहकार्याने सीमापार बिल पेमेंट सोल्युशन देत आहे.

बेकॉनचे सहसंस्थापक तसेच मुख्य उत्पादन आणि तंत्रज्ञान अधिकारी आदित्य म्हात्रे म्हणाले की, कॅनडातील एक एनआरआय म्हणून मला माझ्या कुटुंबासाठी भारतात पेमेंट करताना अडचणी येत होत्या. म्हणूनच आम्ही येस बँक आणि भारत कनेक्टसोबत भागीदारी करत बेकॉन इंडिया बिल पे तयार केले. माझ्यासारख्या एनआरआयना अविरत सुविधा पुरवण्यासाठीच हे उत्पादन तयार करण्यात आले आहे.

येस बँक समर्थित असलेली ही सेवा भारतीय बिलर्सना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे नियमित केलेलया रुपी ड्रॉइंग अरेंजमेंटनुसार पेमेंटची प्रक्रिया अतिशय सुलभ उपलब्ध करून देते. परदेशातून भारतात फंड ट्रान्सफर या सेवेद्वारे सोपे होते. तसेच भारत कनेक्ट नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील लाभार्थ्यांशी त्यांना जोडून दिले जाते. बेकॉन इंडिया बिल पे नेही पेमेंट सुविधा सुरु करण्यासाठी भारतातील राष्ट्रीय बिल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात भारत कनेक्टचा लाभ घेतला आहे, जे पूर्वी भारत बिल पेमेंट सिस्टिम म्हणून ओळखले जात होते. RBI च्या संकल्पनेतून साकार झालेले भारत कनेक्ट हे भारतातील लाखो ग्राहक आणि उद्योजकांकरिता बिल पेमेंट कलेक्शन आणि सेटलमेंट सुविधा प्रदान करणारे टेक्नोलॉजी सोल्युशन आहे. याद्वारे सुरक्षिततेसाठी एंड टू एंड एन्क्रिप्शन आरबीआय नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. बिलर्स, पेमेंट प्रोव्हायडर्स आणि ग्राहकांना एकमेकांशी जोडले जाते.

Continue reading

तब्बल 40 वर्षांनी भारताचे दुसरे अंतराळवीर झेपावणार अवकाशात

अंतराळ क्षेत्रात वाटचालीत एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत सज्ज झाला असून, पुढच्या महिन्यात भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम आयोजित होणार आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांषू शुक्ला, ऍक्झियॉम स्पेसच्या एएक्स-4 मोहिमेचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ...

पोराचा बाजार उठला रं…

जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षकगीत रिलीझ करण्यात आलं. त्यापाठोपाठ आता याच चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं..' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सूरज चव्हाण, जुई...

‘एप्रिल मे 99’ने होणार मराठी चित्रपट महोत्सवाला सुरूवात

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४१ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६...
Skip to content