Homeबॅक पेज१६ फेब्रुवारीला जामनेरमध्ये...

१६ फेब्रुवारीला जामनेरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल!

महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. जामनेरच्या भूमीवर १६ फेब्रुवारीला ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’सोबत ‘देवाभाऊ केसरी’ ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती दंगल आयोजित करण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सुरू होणारा नमो कुस्ती कुंभ रात्री ८ वाजेपर्यंत एकापेक्षा एक लढतीचा थरार सादर करणार आहे.

‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दंगलीमध्ये भारत, फ्रान्स, मोल्दोवा, इराण, जॉर्जिया, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरीसारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. हे मोठे आयोजन मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कुस्ती दंगलीचे प्रमुख आयोजक महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्रात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा करण्यात येणार आहे. हे क्रीडा संकुल सामान्य घरातील खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा पुरवण्यासाठी मोठी भूमिका बजावेल. या दंगलीमुळे कुस्ती रसिकांसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या कुस्तीपटूंना एकाच मंचावर पाहण्याची ही अनोखी संधी लाभणार असल्यामुळे लाखो कुस्तीप्रेमींच्या नजरा आतापासूनच लागल्या आहेत.

Continue reading

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...

एसआयआरसाठी लागणारी माहिती जमा करा ८ ऑगस्टपर्यंत

महाराष्ट्रात सध्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदारयादीतील सर्व मतदारांनी येत्या ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीला येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले...
Skip to content