Homeचिट चॅटवस‌ईच्या सूर्योदय आरबीएल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले.

गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर संघावर सात गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबई उपनगरकडून जस्टीनने सर्वात अधिक 15 धावा, तर सिध्दांतने 14 धावा केल्या. सूर्योदय आरबीएल स्कूलच्या अनुज त्रिपाठी याने एकाच षटकात दोन गडी बाद केले. 56 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सूर्योदय आरबीएल स्कूलचा पहिलाच गडी रोहन गुटाल शून्य धावांवर बाद झाला. पण नंतर अनुज त्रिपाठी 15 धावा केल्या. त्याला रोहित पोथेन आणि ओबेद डायस यांनी दहा, दहा धावा करून सुरेख साथ दिली. लवेश डऊलने सहा धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अनुज त्रिपाठी याला उत्कृष्ट गोलंदाज व सर्वाेत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार ओबेद डायसला देण्यात आला. विजयी संघातील सर्व खेळाडूंचे तसेच अविनाश महाडीक (क्रीडा शिक्षक), शिक्षक शंकर परब, स्टेफी टिचर व महिमा टिचर यांचे प्रिन्सिपॉल अनुसया प्रधान यांनी खास अभिनंदन केले.

Continue reading

युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलचे यश

प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील टीएमसी स्टेडियम, मुंब्रा येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐरोलीच्या न्यू होरायझन स्कूलने सर्वाधिक पदके जिंकून शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ठाणे आणि...

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...
Skip to content