Friday, February 7, 2025
Homeचिट चॅटपुराणिक क्रिकेटः सुपर...

पुराणिक क्रिकेटः सुपर ओव्हरमध्ये फोर्ट यंगस्टर्सची राजावाडी क्लबवर मात

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत जान्हवी काटे व मानसी पाटील यांच्या अष्टपैलू खेळामुळे फोर्ट यंगस्टर्स संघाने सुपर ओव्हरमध्ये गतउपविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबवर मात केली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिवाजी पार्क येथील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा ७ विकेटने पराभव केला. विजयी संघाच्या अष्टपैलू खेळाडू पूनम राऊत व मध्यमगती गोलंदाज जाई गवाणकर चमकल्या. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जान्हवी काटे व जाई गवाणकर यांनी पटकाविला.

राजावाडी क्लबने नाणेफेक जिंकून फोर्ट यंगस्टर्सला प्रथम फलंदाजी दिली. सलामी फलंदाज जान्हवी काटे (५६ चेंडूत ८६ धावा) व मानसी पाटील (३१ चेंडूत ३४ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केल्यामुळे फोर्ट यंगस्टर्सने मर्यादित २० षटकात ४ बाद १६३ धावांचा पल्ला गाठला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सलामी फलंदाज अचल वळंजूने (३३ चेंडूत ४१ धावा) एक बाजू नेटाने लढवूनही १२व्या षटकाला राजावाडी क्लबचा निम्मा संघ ७८ धावांत तंबूत परतला. अशी करामत मानसी पाटील (२९ धावांत ३ बळी) व हिमजा पाटील (२१ धावांत २ बळी) यांच्या फिरकी गोलंदाजीने केली. तरीही क्षमा पाटेकर (३१ चेंडूत नाबाद ६० धावा) व निविया आंब्रे (२७ चेंडूत नाबाद ३३ धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी ४८ चेंडूत ८५ धावांची अभेद्य भागीदारी करून प्रतिस्पर्ध्यांच्या १६३ धावसंख्येशी बरोबरी केली. परिणामी सामना सुपर ओव्हरमध्ये रंगला. मानसी पाटीलच्या ऑफब्रेक गोलंदाजीपुढे राजावाडी क्लबला ६ चेंडूत केवळ ८ धावाच काढता आल्या. जान्हवी काटेच्या (३ चेंडूत नाबाद ९ धावा) खणखणीत दोन चौकारामुळे ४ चेंडूत बिनबाद १० धावा फटकाविल्यामुळे फोर्ट यंगस्टर्सचा विजय सुकर झाला.

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या डावाची सुरुवात जाई गवाणकर (२६ धावांत ४ बळी) व सिध्दी पवार (५ धावांत २ बळी) यांच्या अचूक मध्यमगती माऱ्यामुळे डळमळीत झाली. किंजल कुमारीने (४२ चेंडूत ४३ धावा) दमदार फलंदाजी करूनही साईनाथ क्लबला २० षटकात ८ बाद ११४ धावांपर्यंतच मजल मारता आली. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने १४ व्या षटकाला ३ बाद ११७ धावा नोंदवून विजयी लक्ष्य सहज गाठले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

सचिन तेंडुलकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे!

प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात सहकुटूंब भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती आणि सचिन यांनी अमृत उद्यानातही फेरफटका मारला. राष्ट्रपती भवनाचा उपक्रम असलेल्या ‘राष्ट्रपती भवन विमर्श शृंखला’अंतर्गत झालेल्या चर्चेतही सचिनने भाग घेतला. क्रिकेटपटू म्हणून...

कला महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची स्पर्धा!

राज्यातल्या उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतल्या सर ज. जी. कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, प्रभावी याबरोबरच सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, जाहिरात डिझाईन आणि टॅगलाईन अशा तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत....

गडचिरोली मलेरियामुक्तीसाठी 1 एप्रिलपासून होणार खास प्रयत्न

महाराष्ट्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार मलेरियामुळे देशातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे....
Skip to content