Homeमुंबई स्पेशलकाळा घोडा महोत्सवातल्या...

काळा घोडा महोत्सवातल्या पर्यटकांना पालिका बचतगटांच्या उत्पादनांची भुरळ

मुंबईतल्या फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कलामहोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचतगटांनीदेखील या महोत्सवात दालन प्रदर्शित केले आहेत. महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेली विविध आभूषणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत.

कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुंबईतल्या काळा घोडा महोत्सवाला विशेषत्वाने ओळखले जाते. या महोत्सवाच्या माध्यमातून नवकलाकारांना सतत उर्जा मिळत असते. यंदा शनिवारी २५ जानेवारीपासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवार, २ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात मुंबईसह देशभरातल्या कलाकारांनी आपली कलादालने प्रदर्शित केली आहेत.

गरजू महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिका सातत्याने विविध योजना राबवित असते. पालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचतगटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचतगटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठीदेखील पालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. याचाच एक भाग म्हणून काळा घोडा महोत्सवातही पालिकेने या बचतगटांसाठी दालने उपलब्ध करून दिली आहेत. या महोत्सवात १८ बचतगट सहभागी झाले आहेत. त्यामध्ये बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, एल, एम पश्चिम, एन, एस, पी उत्तर, आर दक्षिण या प्रशासकीय विभागातील बचतगटांचा समावेश आहे. कापडव्यवसाय, आभूषणे, कापडी पिशव्या, खाद्यपदार्थ, गोधडी, शिल्पकला, महिलांसाठीच्या-कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग अशी निरनिराळी उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. काळा घोडा महोत्सवात सहभागी झालेल्या १८ बचतगटांनी फॅन्सी चप्पल, बॅग, गोधडी, लाकूड फेब्रिक ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, आभूषण या प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारी दालने उभारली आहेत.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content