Homeब्लॅक अँड व्हाईट"ट्रम्प टेरिफ"ची जगभरात...

“ट्रम्प टेरिफ”ची जगभरात धास्ती!


अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी, एक फेब्रुवारीला नवे अमेरिकी व्यापार धोरण (ट्रेड पॉलिसी) अन् नव्या करांची (टेरिफ) घोषणा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जगभरात अनिश्चितता अन् धास्ती आहे. ट्रम्प प्रशासनाकडून मेक्सिको, कॅनडावर नवे वाढीव कर (टेरिफ) लादले जाण्याची दाट शक्यता आहे.

तसे पाहिले तर, मेक्सिकोशी अमेरिकेचा 700 बिलियन डॉलर्सचा व्यवहार असूनही ट्रम्प सीमेवरील घुसखोरीच्या मुद्द्यावरून अतिशय कठोर भूमिकेत दिसत आहेत. सध्या अमेरिकेत येणाऱ्या बहुतांश कार्स मेक्सिकोतून उत्पादित होऊन येतात. ट्रम्प-1 काळात अनेक कंपन्यांनी मेक्सिकोत उत्पादन सुरू केले होते. ट्रम्प यांची अन्-प्रेडिक्टेबल वर्किंग स्टाईल आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियासारख्या अगदी छोट्या देशावर 25% कर लादण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र, कोलंबियाने हातपाय जोडून विनवणी करताच दोन दिवसांत तत्काळ त्यांनी ही घोषणा फिरवली. अर्थात ही ट्रम्प यांची वर्किंग स्टाईल राहिली आहे. ते जाणूनबुजून स्वतःला अशा पद्धतीने “अन्-प्रेडिक्टेबल” राखण्याचा प्रयत्न करतात. पत्रकार परिषदांत तर ट्रम्प मस्ती चढल्यासारखे बेभान होऊन घोषणा करतात, त्यांना भलताच चेव चढतो.

ट्रंप

चीन, मेक्सिको, कॅनडाबरोबरच भारतही रडारवर?

कोलंबियासारख्या अमेरिकेवर सर्वस्वी अवलंबून असलेल्या देशांना कायम आपल्या कह्यात अन् उपकाराच्या ओझ्याखाली ठेवण्यासाठी हे असले खेळ केले जातात. त्यातून इतर छोट्या देशांना संदेश देण्याचा प्रयत्न असतो. अमेरिका आजही जगातील एकमेव महासत्ता असल्याचा या मंडळींचा कैफ अजून कायम आहे. त्यातून सातत्याने चीनसारख्या मोठ्या प्रतिस्पर्धी देशालाही दणके देणे सुरूच असते. यावेळी मात्र मेक्सिको, कॅनडासारखे देशही अग्रक्रमाने रडारवर आहेत. रशिया-युक्रेनला तंबी भरली गेली आहे. अमेरिकेच्या याच सत्ता कैफातून यावेळी भारताला तर टेरिफिक टेरिफ तडाखा दिला जाणार नाही ना, याचीच भीती आहे. भारताची तारिफ की टेरिफ, हाच सध्याच्या घडीला भारतात सर्वांना सतावणारा प्रश्न आहे.

सोन्याची झळाळी नव्या उंचीवर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेधुंद कारभाराच्या अनिश्चिततेमुळे सध्या सोन्यातील भरवशाची मानली जाणारी गुंतवणूक वाढत आहे. भारतात आज सोने 81,128 ₹ या एका नव्या “लाईफ हाय”ला म्हणजे सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. दुसरीकडे, डिजिटल सोने म्हणजे क्रिप्टो करन्सीकडेही कल वाढत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रीय बँका आता त्यांचा डॉलर्समधील काही राखीव साठा थोडा-थोडा सोन्यात गुंतवू लागल्या आहेत. झेक प्रजासत्ताकने तर डॉलर्समधील काही गुंतवणूक काढून क्रिप्टो करन्सीत गुंतवली आहे. नोव्हेंबरनंतर क्रिप्टोमध्ये काहीशी घसरण असली तरी ट्रम्प पती-पत्नीच्या स्वतंत्र क्रिप्टो चलनानंतर या क्षेत्रातील हालचाल वाढली आहे. ट्रम्प यांनी काही नवी क्रिप्टो रेग्युलेशन पॉलिसी जाहीर केल्यास हाही बाजार तेजीत येण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.

Continue reading

या आहेत पावसाच्या काही भन्नाट आणि हटके गोष्टी!

जगभरातील पावसाच्या काही भन्नाट आणि हटके गोष्टी: 1. भारतातल्या मेघालयमधील मॉसिनराम हे गाव जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. इथे दरवर्षी सुमारे 11,971 मिमी पाऊस पडतो! 2. केरळमध्ये 2001 साली लाल रंगाचा पाऊस पडला होता. हा पाऊस Trentepohlia नावाच्या शैवालाच्या कणांमुळे...

गेल्या शैक्षणिक वर्षात मिश्र राहिला प्लेसमेंट ट्रेण्ड!

2024-25 मध्ये प्लेसमेंट ट्रेण्ड मिश्र राहिला. टॉप आयआयटी, आयआयएममध्ये सुरुवात जोरदार झाली; पण नंतर थोडी मंदावली. काही ठिकाणी फक्त 70% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली.  सर्वाधिक प्लेसमेंट देणारे टॉप टेन कोर्सेस: 1. Computer Science/IT 2. Electronics & Communication 3. Mechanical 4. Electrical 5. Civil 6. Data Science/AI 7. MBA...

भारतातल्या एकमेव ज्वालामुखीच्या बेटावर राहतात फक्त बकऱ्या, उंदीर आणि पक्षी!

सध्या इंडोनेशियात लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींचा "हॉटस्पॉट" बनला आहे, ज्यात अनेक सक्रिय आणि धोकादायक ज्वालामुखी आहेत. जगातील आकाराने किंवा सक्रियतेने जे सर्वात मोठे...
Skip to content