जळगाव येथे झालेल्या तिसऱ्या मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना एकूण १७ पदकांची कमाई केली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश होता.
या स्पर्धेत १६ राज्यांतून ३७८ खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जळगावच्या माजी महापौर सीमा भोळे, उपस्थित होत्या. उद्घाटनप्रसंगी दाखवण्यात आलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच दाद मिळवली. या खेळाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्वासन खडसे यांनी दिले. यावेळी संघटनेचे साऊथ एशिया अध्यक्ष मंदार पनवेलकर, राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मिंग, राष्ट्रीय महासचिव संतोष खंदारे, राज्य अध्यक्ष प्रशांत मोहिते आणि सचिव विनोद कुंजीरदेखील उपस्थित होते. सोहम सावंत संघाचे प्रशिक्षक होते. व्यवस्थापक म्हणून रोहित थाळी संघासोबत होते.
स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू:
सुवर्णः वरद केणी, अनिकेत दुशिंग, प्रज्वल दरेकर, कौस्तुभ जोशी, अंगत कदम, अथर्व मदने, निकुंज पिंगळे, फिरोज अन्सारी, सृष्टी पवार, वासुसेन जुनघरे.
रौप्यः तनिषा शेणपती, आदित्य भागवत, अवनीश कंक, वर्धन कदम.
कांस्यः मनोज भंडारी, करण शिरोडकर, पार्थवी भांड.