Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांनो, अर्थसंकल्पासाठी पालिकेला...

मुंबईकरांनो, अर्थसंकल्पासाठी पालिकेला पाठवा सूचना!

मुंबई महापालिकेच्या सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजासाठी पालिका प्रशासनाकडून मुंबईकर नागरिकांना येत्या १७ जानेवारीपर्यंत ई-मेलने अथवा लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई-मेलवर सूचना कराव्या, असे आवाहन पालिकेने केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई मेलवर शुक्रवार, दिनांक १७ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे. हे अर्थसंकल्पीय अंदाज येत्या ५ फेब्रुवारीला अथवा तत्पूर्वी सादर करण्‍यात येणार आहे. या अनुषंगाने, लोकसहभागाच्या दृष्टीने मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५पर्यंत ई-मेल आयडी bmcbudget.suggestion@mcgm.gov.in यावर सूचना पाठवाव्यात. ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील त्यांनी शुक्रवार, १७ जानेवारी २०२५पर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोहोचेल, अशा बेताने खालील पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ताः

प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय,
चौथा मजला, विस्तारित इमारत,
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय,
महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content