Homeचिट चॅटशेख, नंदिनी, तन्मय,...

शेख, नंदिनी, तन्मय, वैभवी, मयुर, काजल ठरले सर्वोत्तम लिफ्टर

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्य बेंचप्रेस स्पर्धेत क्लासिक गटात शेख समीर, नंदिनी उपर, तन्मय पाटील, वैभवी माने, मयुर शिंदे, काजल भाकरे यांनी आपापल्या गटात सर्वोत्तम लिफ्टरचा किताब संपादन केला.

आमदार कालिदास  कोळंबकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी मैदान बचाव समितीचे भास्कर सावंत हेदेखील उपस्थित होते. क्लासिक व इक्वीप या गटात स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत ३००पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात शासनाने क्रीडा विभागामध्ये विविध पदावर थेट नियुक्त केलेल्या १६ पॉवरलिफ्टिंग खेळाडूंचा विशेष गौरव खेळाडूंचे पालक व प्रशिक्षक यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नामवंत जेष्ठ खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रक्षा महाराव (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), संजय माधव हेदेखील उपस्थित होते.

क्लासिक स्पर्धा किताब विजेते-

१) सब ज्युनिअर स्ट्राँग मॅन शेख समीर (पालघर), २) सब ज्युनिअर स्ट्राँग वुमन नंदिनी उपर (रायगड), ३) ज्युनिअर स्ट्राँग मॅन तन्मय पाटील (रायगड), ४) ज्युनियर स्ट्राँग वुमन वैभवी माने (सोलापूर), ५) सीनियर स्ट्राँग मयूर शिंदे (पुणे), ६) सीनियर स्ट्राँग वुमन काजल भाकरे (ठाणे), ७) मास्टर १ (४० वर्षांवरील) स्ट्राँग मॅन पोनराज नाडर (मुंबई), ८) मास्टर १ (४० वर्षांवरील) स्ट्राँग वुमन डॉ. शर्वरी इनामदार (पुणे), ९) मास्टर २ (५० वर्षांवरील) स्ट्राँग मॅन सचिन कोचरेकर (ठाणे), १०) मास्टर २ (५०वर्षांवरील) स्ट्राँग वुमन- गीतांजली दस्तूर (मुंबई), ११) मास्टर ३ (६० वर्षांवरील) स्ट्राँग मॅन गुलाम मोहम्मद शेख (मुंबई).  

इक्विप स्पर्धेतील किताब विजेते  खेळाडू-

१) सब ज्युनिअर स्ट्राँग मॅन वेदांत कदम (ठाणे जिल्हा), २) सब ज्युनिअर स्ट्राँग वुमन सानिका जठार (मुंबई जिल्हा), ३) ज्युनिअर स्ट्राँग मॅन अक्षय प्रजापती (उपनगर मुंबई), ४) जुनिअर स्ट्राँग वुमन सेजल मकवाना (उपनगर मुंबई), ५) सीनियर स्ट्राँग मॅन गणेश तोटे (रायगड), ६) सीनियर स्ट्राँग वुमन काजल भाकरे (ठाणे), ७) मास्टर १ (४० वर्षांवरील) स्ट्राँग मॅन अजिनाथ शेकडे (छत्रपती संभाजी नगर), ८) मास्टर १ (४० वर्षांवरील) स्ट्राँग वुमन डॉ. शर्वरी इनामदार (पुणे), ९) मास्टर २ (५९ वर्षांवरील) मास्टर स्ट्राँग मॅन मनीष कोंढरा (पुणे).

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content