Homeकल्चर +अशोक सराफ करणार...

अशोक सराफ करणार छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

‘बिग बॉस मराठी’, या बहुचर्चित कार्यक्रमाची नुकतीच सांगता झाली. पण प्रेक्षकांच्या लाडक्या ‘कलर्स मराठी’वर आता नव्या मनोरंजनाची सुरुवात होणार आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे आवडते अभिनेते, अभिनयसम्राट, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ घेऊन येत आहेत एक नवी मालिका ‘अशोक मा.मा.’.

अशोक सराफ

अशोकमामांची ही नवीकोरी मालिका तुफान एंटरटेनिंग असणार यात काही शंका नाही. ‘येतोय महाराष्ट्राचा महानायक’ म्हणत ‘कलर्स मराठी’ने काही दिवसांपूर्वी ‘अशोक मा.मा.’ या मालिकेची पहिली झलक समोर आणली होती. अशातच आता या मालिकेचा उत्सुकता वाढवणारा नवा प्रोमो समोर आला आहे. शिस्तीचं पालन करणारे, काटकसरीचा स्वभाव असणारे, स्वत:च्या निर्णयांवर ठाम असणारे ‘अशोक मा.मा.’ म्हणजेच अशोक माधव माजगावकर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

अशोक सराफ

बत्तीस वेळा काम सोडून गेलेली मोलकरीण तेहतीसव्यावेळी पुन्हा कामावर येते. त्यावेळी काटकसरी स्वभाव असलेले अशोक मा.मा. मोलकरीण थोडं जास्त वापरत असलेल्या तेलावरून, साबणावरून तिच्यासोबत वाद घालतात. त्यांच्यातला हा वादाचा गमतीशीर प्रसंग प्रेक्षकांची मात्र उत्कंठा वाढवतोय. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री नेहा शितोळे या मालिकेत अशोक मामांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. तिने वठवलेली मोलकरीण चांगलाच भाव खाऊन जातेय.

अशोक सराफ

‘अशोक मा.मा’ या मालिकेच्या माध्यमातून एक आगळीवेगळी कथा घेऊन टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचे लाडके अशोकमामा सज्ज आहेत. आपल्या मिश्कील अंदाजाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे अशोक सराफ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content