Homeचिट चॅटनंदिनी, अमृता, श्रेयश,...

नंदिनी, अमृता, श्रेयश, तन्मय, गणेश, दिनेश ठरले सर्वोत्तम लिफ्टर

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रायगड बेंचप्रेस, क्लासिक आणि इक्विप या स्पर्धेत नंदिनी उमप, अमृता भगत, श्रेयश जाधव, तन्मय पाटील, गणेश तोटे, दिनेश पवारने अनुक्रमे आपापल्या गटात सर्वोत्तम लिफ्टरचा मान मिळवला.

रॉयल गार्डन, मुद्रे, कर्जत येथे सदर स्पर्धा पार पडली. सुधाकर परशुराम घारे (माजी उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण आरोग्य व क्रीडा  समिती रायगड जिल्हा परिषद) यांच्या सौजन्याने कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने ही स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई यांचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला लाभले.

या स्पर्धेच्या क्लासिक सबज्युनिअर मुलींच्या गटात नंदिनी उपर (बॉडी लाईन जिम खोपोली), ज्युनियर मुलींच्या गटात अमृता भगत (पॉवर हाऊस क्लब, खोपोली) ह्या किताब विजेत्या झाल्या. सबज्युनिअर क्लासिक मुलांच्या गटात श्रेयश जाधव (आयर्न मॅट जिम, खोपोली), ज्युनियर मुलांच्या गटात तन्मय पाटील (संसार जिम, पेण), सीनियर क्लासिक पुरुष गटात गणेश तोटे (फिट ऑन जिम, पनवेल) आणि मास्टर्स (४९, ५०, ६०, आणि ७० वर्षांवरील स्पर्धक) स्पर्धेत दिनेश पवार (स्पार्टन जिम, लौजी खोपोली) हे किताब विजेते ठरले.

सांघिक विजेतेपद जी व्ही आर जिम, कर्जत यांना मिळाले. उपविजेतेपद हनुमान व्यायाम शाळा, पेण यांनी पटकावले तर तृतीय क्रमांक बॉडी लाईन जिम, खोपोली यांना मिळाला. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोगल, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर आणि सचिव अरुण पाटकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेत मुंबईचे गोपीनाथ पवार, सुरेश धुळप, जितेंद्र यादव, अंकुश सावंत, प्रशांत सरदेसाई, साहिल उतेकर, पुण्याचे विजय पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content