Homeचिट चॅटमास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय...

मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत रमेश खरेंना सुवर्णपदक

मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विप्ड आणि अनईक्विप्ड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.

पेणच्या हनुमान व्यायामशाळेत सराव करणाऱ्या रमेश उर्फ आप्पा खरे यांची निवड 66 किलो वजनी गटासाठी झाली होती. या स्पर्धेत ज्येष्ठ पॉवरलिफ्टिंग खेळाडू रमेश खरे यांनी एकूण 205 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. स्कॉट या प्रकारात 60 किलो, बेंच प्रेस प्रकारात 55 किलो आणि डेडलिफ्ट प्रकारात 90 किलो असे एकूण 205 किलो वजन त्यांनी उचलले. त्याबद्दल त्यांना गटातून पहिले आणि इतर प्रकारातीलही पहिले अशी एकूण चार सुवर्णपदके मिळाली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हेड मेकॅनिक या पदावरून सेवानिवृत्त झालेले रमेश खरे हनुमान जिमचे संचालक, राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग पदकविजेते दाम्पत्य “राजेश अंनगत”आणि “मयुरा अंनगत” यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. तसेच खरे शरीरसौष्ठव पंच असून रायगड संघटनेवर कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, उपाध्यक्ष सुभाष भाटे (महाड), सहसचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य संदीप पाटकर, सुभाष टेंबे (माणगाव), दत्तात्रय मोरे (कर्जत), कार्याध्यक्ष यशवंत मोकल, माधव पंडित आणि सचिव अरुण पाटकर यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे. रमेश खरे यांनी या वयात सुवर्णपदक प्राप्त करून एक प्रेरणादायी आदर्श रायगड जिल्ह्यातील आजच्या तरुण पिढीला दिला आहे, असे मत संजय सरदेसाई (सचिव, महाराष्ट्र राज्य असोसिएशन) यांनी व्यक्त केले.

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content