Homeब्लॅक अँड व्हाईटमुलांच्या ऑनलाईन लैंगिक...

मुलांच्या ऑनलाईन लैंगिक शोषणाविरूद्ध ‘वेब सेफ अँड वाईज’!

लहान मुलांचं होणारं ऑनलाईन लैंगिक शोषणाविरूद्ध लढण्याकरीता महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि चाईल्डफंड इंडिया वर्षभरासाठी ‘वेब सेफ अँड वाईज’ उपक्रम राबविणार आहेत.

लहान मुलांना जगभरातल्या ज्ञानाची कवाडं खुली करण्यात आणि शिक्षणाची गंगा सर्वदूर पोहोचवण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या इंटरनेटमुळे लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारं लहान मुलांचं लैंगिक शोषण ही जागतिक समस्या ठरत आहे. या समस्येशी लढण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि चाईल्डफंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एक योजना आखण्यात आली आहे. ‘वेब सेफ अँड वाईज’ असं या उपक्रमाचं नाव असून वर्षभर हा उपक्रम चालणार आहे.

याबाबतच्या सामंजस्य करारावर बुधवारी सह्या करण्यात आल्या. यावेळी चाइल्डफंड इंडियाचे राजेश रंजन सिंग- बोर्ड मेंबर (चाइल्डफंड इंडिया), अमरकुमार सिंग- वरिष्ठ व्यवस्थापक कार्यक्रम (चाइल्डफंड इंडिया) आणि महिला व बालहक्क संरक्षण आयोगाचे डॉ. भालचंद्र चव्हाण, ॲड. निलिमा चव्हाण  इतर अनेक सदस्य उपस्थित होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही पोर्नोग्राफिक साईट्सच्या माध्यमातून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. याबाबतची ठोस आकडेवरी उपलब्ध नाही. मात्र हे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी, त्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि या लैंगिक शोषणाबाबतची आकडेवारी गोळा करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि चाईल्डफंड इंडिया यांनी एकत्रित योजना आखल्याची माहिती राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी दिली.

या उपक्रमाद्वारे राज्यात ऑनलाईन लैंगिक शोषणाची परिस्थिती काय आहे, याचा विस्तृत अभ्यास होणार आहे. त्याशिवाय हे गैरप्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावरही अभ्यास होईल. असे प्रकार घडल्यास त्यावर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, त्यांना याबाबत प्रशिक्षण देणे, अशा गोष्टींचा समावेश या उपक्रमात असेल. त्याचप्रमाणे जनजागृतीचे उपक्रमही राबवण्यात येतील, असे ॲड. शाह यांनी सांगितले.

ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचार तसेच ऑनलाईन सुरक्षितता या विषयांवर मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी शाळा आणि विविध संस्थांमध्ये प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी चाईल्डफंड इंडिया या संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content