Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबईत पहिल्यांदाच दरडप्रवण...

मुंबईत पहिल्यांदाच दरडप्रवण ठिकाणी बसणार जिओ नेटिंग!

मुंबईतल्या घाटकोपरच्या आझाद नगर येथील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या व संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुंबईतील संभाव्य ३१ ठिकाणी दरडप्रवण क्षेत्राची स्थिती पाहता अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर यानिमित्ताने सुरू झाला आहे.  

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात ३१ ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर दरडप्रवण क्षेत्रात दगड रोखून धरण्यासाठी जिओ नेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने घाटकोपर येथे हनुमान टेकडी (आझाद नगर) परिसरात काम सुरू आहे. स्वित्झर्लंडच्या बनावटीचे साहित्य वापरून बोल्टिंगचे काम हनुमान टेकडी परिसरात सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या वतीने मुंबईत पहिल्यांदाच अशा जिओ नेटिंगच्या तंत्रज्ञानावर आधारित काम करण्यात येत आहे. मुंबईतील नागरिकांना या पद्धतीने होणाऱ्या कामामुळे नक्कीच सुरक्षिततेचा पर्याय मिळणार आहे. पावसाळ्यातही ही बोल्टिंगची कामे सुरू राहणार आहेत. मुंबईकरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने एक दिलासा देणारा पर्याय या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उपलब्ध होणार आहे. हजारो लोकांच्या जीविताची काळजी करतानाच याठिकाणी कोणत्याही परिस्थितीत धोका निर्माण होणार नाही, यादृष्टीने सर्व उपाययोजना सुरू आहेत.

स्वित्झर्लंड मटेरिअलचा वापर करत बोल्टिंगचे काम हनुमान टेकडी परिसरात सुरू करण्यात आले आहे. एकूण २५०० चौरस मीटरच्या क्षेत्रात बोल्टिंगचा वापर करत दरडप्रवण क्षेत्रात दगड रोखून धरण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एकूण १६ जणांचा प्रशिक्षित चमू दोन पाळ्यांमध्ये हे काम करत आहे. माती तसेच काळा पाषाण (ब्लॕक बसाल्ट) या दरडप्रवण क्षेत्रात आहे. बोल्टिंगचा उपयोग हा पावसाळ्यात पाण्यामुळे खाली सुटून येणारे दगड रोखण्यासाठी होतो. ड्रिल करून सुमारे ८ मीटर इतके आत दगडात ते वापरण्यात येतात. प्रत्येक २ मीटर अंतरावर हे ड्रिलिंगचे काम करण्यात येत आहे. कॉरेक्स, डेल्टेक्स आणि ३२ इंच व्यासाचा अँकर या स्वित्झर्लंड मटेरिअलचा वापर करून बोल्टिंगचे काम करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांतच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हजारो कुटुंबे हनुमान टेकडी परिसरात राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेत आहोत. दरडप्रवण क्षेत्रातील घरांबरोबरच म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार आहोत.

मुख्यमंत्र्यांचा चालत पायथा ते टेकडी थेट प्रवास

असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी हा परिसर अतिशय दाटीवाटीने गजबजलेला आहे. हजारो कुटुंबे या ठिकाणी राहत आहेत. पायथ्यापासून वर टेकडीपर्यंत जाण्यासाठी अतिशय अरुंद, निमुळता आणि थेट वरपर्यंत जाणारा असा रस्ता. थोडंसं चाललं तरी धाप लागावी असा हा मार्ग. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी पायथ्यापासून चालत थेट या मार्गाने टेकडी गाठली आणि तेथील डोंगराला बसवलेल्या सेफ्टी नेटची पाहणी केली.

Continue reading

का लवकर होतो तंबाखू चघळणाऱ्या व्यक्तींना तोंडाचा कर्करोग?

तंबाखू चघळणाऱ्या काही व्यक्तींना तोंडाचा कर्करोग लवकर का होतो? याचे उत्तर टाटा मेमोरियल सेंटरच्या नवीन जीनोम-वाइड अभ्यासातून उघड झाले आहे. मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटर येथील एसीटीआरईसीमधल्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी यांनी केलेल्या एका जीनोम-वाईड असोसिएशन स्टडीमध्ये असे प्रमुख अनुवांशिक...

निलगिरी श्रेणीतले ‘तारागिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात

माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडद्वारे बांधलेले निलगिरी श्रेणीतले (प्रकल्प 17अ)मधले चौथे जहाज 'तारागिरी' मुंबईत माझगाव डॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय नौदलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आले. युद्धनौकेच्या डिझाइन आणि बांधकामातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने झालेले हे आणखी एक मोठे पाऊल आहे. प्रकल्प 17अ...

169पैकी 154 मते मिळवत भारताची आयएमओ परिषदेवर फेरनिवड

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ) परिषदेत भारताची श्रेणी 'ब'मध्ये फेरनिवड झाली आहे. यात, आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 देशांचा समावेश आहे. लंडनमधल्या 34व्या आयएमओ असेम्ब्लीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारताने या श्रेणीत सर्वाधिक मते मिळवली. 169 वैध मतांपैकी 154 मते मिळवण्यात भारताला यश आले. केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री...
Skip to content