Homeब्लॅक अँड व्हाईटशिक्षक-पदवीधर मतदानासाठी विशेष...

शिक्षक-पदवीधर मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

महाराष्ट्रात येत्या २६ जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा (स्पेशल कॅज्युअल लिव्ह) घेता येणार आहे. या कर्मचाऱ्यांना नियमित मिळणाऱ्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त ही नैमित्तिक रजा असेल.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१च्या कलम १३५-बनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची तरतूद आहे. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने, त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्त‍िक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या २४ मे २०२४ रोजी जारी झालेल्या प्रसिद्धीपत्रकान्वये विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक व मुंबई या शिक्षक मतदारसंघांच्या व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी येत्या बुधवारी २६ जूनला सकाळी ७.०० ते सायं ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सोमवारी, १ जुलै २०२४ रोजी याची मतमोजणी होणार आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content