Homeब्लॅक अँड व्हाईटभारत आयोजित करणार...

भारत आयोजित करणार ‘एक्स तरंग शक्ती’ हवाई युद्धसराव!

अमेरिकेच्या हवाई दलाच्या अलास्का इथल्या आइल्सन हवाई तळावर नुकत्याच झालेल्या एक्स रेड फ्लॅग या हवाई युद्धसरावादरम्यान मिळालेल्या समृद्ध अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवाई दलही एक्स तरंग शक्ती 2024, या हवाई युद्धसरावाचे आयोजन आणि त्यात सहभागी होत असलेल्या इतर देशांच्या हवाई दलांच्या तुकड्यांचे यजमानपद भूषवण्यासाठी सज्ज झाला आहे. एक्स तरंग शक्ती 2024 हा हवाई युद्धसराव भारताच्या वतीने आयोजित पहिला बहुराष्ट्रीय हवाई युद्धसराव असणार आहे. चालू वर्षाच्या अखेरीला हा हवाई युद्धसराव आयोजित केला जाणार आहे.

युद्धसराव

अमेरिकेच्या हवाई दलाच्या अलास्का इथल्या आइल्सन हवाई तळावर नुकत्याच झालेल्या एक्स रेड फ्लॅग 2024 हवाई युद्धसरावात भारतीय हवाई दलाच्या तुकडीने यशस्वी सहभाग नोंदवला. विविध देशांच्या हवाई दलांचा सहभाग असलेला हा सराव 4 जूनला सुरू झाला. या सरावाचा 14 जूनला समारोप झाला. एक्स रेड फ्लॅग 2024चे हे दुसरे पर्व होते. हा सराव एक प्रगत लढाऊ हवाई प्रशिक्षण सराव असून अमेरिकी हवाई दलाच्या वतीने वर्षातून चार वेळा हा सराव आयोजित केला जातो. या सरावात भारतीय हवाई दलासह रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्स, ब्रिटनचे रॉयल एअर फोर्स, रॉयल नेदरलँड्स एअर फोर्स, जर्मन लुफ्तवाफ्फे आणि यूएस एअर फोर्स सहभागी झाले होते.

या सरावात भारतीय हवाई दलाच्या तुकडीत राफेल विमानांच्या ताफ्यासह हवाई कर्मचाऱ्यांचे पथक, तंत्रज्ञ, अभियंते, नियंत्रक आणि हवाई दलाशी संबंधित विषय तज्ञांचा समावेश होता. एक्स रेड फ्लॅग या हवाई युद्ध सरावात भारतीय हवाई दलातील राफेल विमानांचा हा पहिलाच सहभाग होता. यावेळी या विमानांनी सिंगापूर तसेच अमेरिकी हवाई दलांच्या एफ-16 आणि एफ-15 तसेच अमेरिकी हवाई दलाच्या ए-10 या लढाऊ विमांनांसोबत उड्डाण करत युद्धसराव केला. सरावात सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या पथकाने युद्धसरावातील मोहिमांच्या आखणी आणि नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय त्यांनी सरावादरम्यान त्यांच्यावर सोपवलेल्या विशिष्ट मोहिमांचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारीही पार पाडली.

या सरावाच्या काळातली हवामानविषयक परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. शिवाय बहुतांश काळ तापमानाचा पारा जवळपास शून्यापेक्षा खाली गेलेला होता. अशा स्थितीतही सरावाच्या संपूर्ण कालावधीत सर्व विमानांची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी आणि या विमानांवर सोपवलेल्या सर्व मोहिमा विनाअडथळा पार पडाव्यात यासाठी भारतीय हवाई दलाच्या देखभाल पथकाने परिश्रमपूर्वक आपली जबाबदारी चोख पार पाडली. त्यांच्या या परिश्रमांमुळेच सरावाच्या संपूर्ण कालावधीत 100पेक्षा जास्त उड्डाणे करणे शक्य झाले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content