Homeएनसर्कल'तुळशी' वाहू लागला!...

‘तुळशी’ वाहू लागला! पाण्याची चिंता कमी होणार!!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणि मुंबई महापालिका क्षेत्रातच असणारा महापालिकेचा  ‘तुळशी’ तलाव आज (१६ जुलै) सकाळी ११ वाजता पूर्ण भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. याचाच अर्थ यंदा हा तलाव ११ दिवस आधीच भरून वाहू लागला आहे. तुळशी तलावाचे पाणी पिण्याकरीता वापरले जाते. त्यामुळे मुंबईकरांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोडा सौम्य होण्याची शक्यता आहे.

८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९मध्ये १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८मध्‍ये ९ जुलैला; वर्ष २०१७मध्‍ये १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तुळशी तलाव मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी तेव्हा सुमारे ४० लाख रुपये खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा (८०४६ दशलक्ष लीटर) असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी विहार तलावाला जाऊन मिळते.

१२ जूनला दुपारी पवई तलाव भरून वाहू लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ दिवस आधी हा तलाव भरून वाहिला. १८९०मध्ये ४० लाख रूपये खर्चून तो बांधण्यात आला होता. त्याचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे त्याचा प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापर केला जातो.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content