Homeमुंबई स्पेशलमुंबई विमानतळावर 4...

मुंबई विमानतळावर 4 दिवसांत 7 कोटींचे सोने जप्त

विमानतळ आयुक्तालयाच्या मुंबई कस्टम झोन -III ने 13 – 16 मे, या चार दिवसांत मुंबईतल्या  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या 27 कारवायांमध्ये 7.16 कोटी रुपये मूल्याचे 11.39 किलोहून अधिक सोने आणि सिगारेटी जप्त केल्या. या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

मेणात लपवलेले सोन्याचे बारीक कण, कच्चे दागिने, रोडियम प्लेटेड पैंजणे आणि सोन्याच्या वड्या अशा विविध स्वरूपात जप्त केलेले सोने आढळले. सामानासोबत, गुदाशयात, बुरख्याखाली आणि प्रवाशांनी सोने परिधान करून ते विविध प्रकारे लपवून त्याची तस्करी केली जात होती.

क्वालालंपूरहून मुंबईकडे निघालेल्या एका परदेशी नागरिकाची तपासणी केली असता त्याच्याकडे हातातील कच्च्या सोन्याचा कडा, साखळी, पेंडंट, दोन अंगठ्या असे एकूण 1093.00 ग्रॅम वजनाचे लपवून ठेवलेले सोने सापडले. हे सर्व सोने 22 कॅरेट गुणवत्तेचे होते. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जेद्दाहहून मुंबईला येत असलेल्या दोन भारतीय नागरिकांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 24 कॅरेटच्या 999.000 ग्रॅम वजनाच्या कच्या सोन्याच्या बांगड्या (16 नग) आढळून आल्या. हे सर्व सोने शरीरावर परिधान करून त्याची तस्करी केली जात होती. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. नैरोबीहून मुंबईला येत असलेल्या दोन परदेशी नागरिकांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे  523.00 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वितळवलेल्या स्वरुपातल्या वड्या (07 नग) आढळल्या. हे सर्व सोने 24 कॅरेट गुणवत्तेचे होते. हे प्रवासी त्यांनी परिधान केलेल्या बुरखा आणि जॅकेटच्या खिशामध्ये लपवून या सोन्याची तस्करी करत होते.

आणखी एका प्रकरणात 22 भारतीय नागरिकांची तपासणी करण्यात आली. या प्रवाशांमध्ये दुबई(10 व्यक्ती),अबू धाबी (03 व्यक्ती), जेद्दाह ( 01 व्यक्ती), कैरो ( 01 व्यक्ती), दोहा (01 व्यक्ती), हाँगकाँग (01 व्यक्ती), क्वालालंपूर (01 व्यक्ती), कुवैत (03 व्यक्ती)आणि मस्कत (01व्यक्ती) यांचा  समावेश आहे. यात लपवलेले 8575 ग्रॅम सोने आढळले. हे सगळे सोने अंतर्वस्त्रांमध्ये, बुरख्याखाली, जीन्सच्या खिशात, गुदाशयात आणि अंगावर परिधान करून त्याची तस्करी केली जात होती. आणखी एका वेगळ्या प्रकरणात अबूधाबीहून प्रवास करत असलेल्या एका भारतीय नागरिकाची चौकशी केली असता तो मेणात (01 नग) कणांच्या स्वरूपात लपवलेल्या सोन्याची तस्करी करत असल्याचे आढळले. हे सर्व कण 197.000 ग्रॅम इतक्या वजनाचे असून ते 24 कॅरेट गुणवत्तेचे आहेत. यासोबतच या प्रवाशाकडे पाकिटावर चित्राच्या स्वरुपात इशारा लिहिलेल्या गोल्ड फ्लेक या सिगारेटच्या 12860 कांड्या सामानात लपवलेल्या आढळल्या.

Continue reading

एका फ्लॅटचे दोन करताय? सावधान!

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे दोन भागांत विभाजन करण्याचा विचार करतात. हे एक सामान्य व्यावहारिक वास्तव आहे. पण, मुंबई उपनगरातील...

न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश!

भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांची भारताचे पुढचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. ते 23 नोव्हेंबरला आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश गवई यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत!

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज एक दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार...
Skip to content