Friday, May 9, 2025
Homeकल्चर +राजा शिवाजी विद्यालयात...

राजा शिवाजी विद्यालयात ‘आई’वर झाले मन मोकळे!

नातेसंबंधांना जिच्यामुळे परिसस्पर्श लाभतो ती म्हणजे “आई”. जगातलं सर्वोच्च आदराचं आणि परमपवित्र स्थान म्हणजे “आई”. प्रेमाच्या अथांग सागरात लेकरांच्या अगणित चुका किंवा अक्षम्य अपराध पोटात सामावून घेणारी व्यक्ती म्हणजे “आई”. ह्याच आईवर अगणित वेळा लिहिलं गेलं आहे आणि यापुढेही लिहिले जाईल. आईबद्दलच्या आपल्या भावना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रितांनी मुंबईतल्या दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

“मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबईतील प्रथितयश कवयित्री सीमा मळेकर ह्या विराजमान होत्या. त्यावेळी शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर हेदेखील उपस्थित होते.

कविसंमेलनामध्ये स्वाती शिवशरण, बालकवी वेदान्त पंडित, विक्रांत लाळे, प्रसाद कोचरेकर, वैभवी गावडे, गौरी पंडित, जयश्री चुरी, संतोष मोहिते, शैलेश निवाते, कल्पना मापूसकर, शितलादेवी कुळकर्णी, आदित्य भडवळकर, किशोरी पाटील, सुनिता अनभुले, सरोज गाजरे, अशोक नार्वेकर आणि कविसंमेलनाच्या आयोजनाचा महत्त्वाचा भाग असलेले सनी आडेकर यांनी पहिल्या सत्रामध्ये जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या सुंदर रचना सादर केल्या. उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. मध्यंतरामध्ये शितलादेवी कुळकर्णी यांनी एक प्रहसन सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेच कवी पुन्हा कविता सादरीकरणासाठी सज्ज झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व कवींनी आपापल्या आवडीची कविता सादर करून सभागृह भारून टाकले.

कविसंमेलनच्या अध्यक्षपदी विराजमान असलेल्या सीमा विश्वास यांनीदेखील आपल्या दोन रचना सादर केल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या आयोजकांच्या कार्याची दखल घेतली. त्या आपल्या मनोगतामध्ये म्हणाल्या की, आपण सर्व कवी नेहमीच सुंदर रचना सादर करण्याचा प्रयत्न करतो. यावेळीही सर्वांच्याच रचना खूप सुंदर होत्या. पण मला बालकवी वेदान्तचे खूप कौतुक करावेसे वाटते. कारण, त्याच्या कविता तर छान असतातच पण ह्या वयात त्याला कविता सुचतात हीच फार कौतुकाची गोष्ट आहे. वेदांत, तुला माझ्याकडून खूपखूप प्रेमळ शुभेच्छा आणि हे कवीपण असेच कायम जप आणि ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे नक्कीच मोठेपणी या क्षेत्रात तू आपला वेगळा ठसा उमटवशील असा आमच्या सर्वांकडूनच तुला आशिर्वाद आहे.

कार्यक्रमाची सांगता करताना ‘मराठी साहित्य व कला सेवा’ आणि ‘शोध आनंदाचा फाऊंडेशन’ यांच्या वतीने सर्वांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जून महिन्याच्या पहिल्या रविवारी पुढचे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी अष्टपैलू साहित्यिक कल्पना मापूसकर यांची निवड करण्यात आली. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, सनी आडेकर, शैलेश निवाते, विक्रांत लाळे आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी परिश्रम घेतले.

Continue reading

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...

उत्तरा केळकर यांना अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा "कृतज्ञता गौरव पुरस्कार" यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. उद्या, शनिवारी 10 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री...
error: Content is protected !!
Skip to content